आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 12:53 IST2025-05-04T12:52:50+5:302025-05-04T12:53:37+5:30

यावेळी संशयास्पद गोष्टी आढळून आल्यानंतर मयूरची आई संगीता आणि बहीण काजल यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.

Mother and sister murdered Mayur Mali, a youth, in Tasgaon, Sangli | आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...

आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...

सांगली - तासगाव शहरातील मयूर माळी या ३० वर्षीय तरुणाचा त्याची आई संगीता माळी आणि बहीण काजल माळी या दोघींनी गुंगीचे औषध देऊन डोक्यात दगड घालून खून केला. हत्येनंतर युवकाचा मृतदेह पेटवण्यात आला. आग लागून मृत्यू झाल्याचा बनाव रचला परंतु तासगाव पोलिसांना संशय आल्याने त्यांनी कसून चौकशी करत आई आणि बहिणीने हत्या केल्याचं उघडकीस आणले. शनिवारी रात्री उशिरा या प्रकरणी फिर्याद दाखल करण्यात आली.

शहरातील कासार गल्ली येथील मयूर माळी हा सामाजिक कार्यकर्ता होता. शुक्रवारी रात्री तो मित्रांसमवेत बोलत थांबला होता. त्यानंतर तो घरी गेला. शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घराच्या आतील बाजूस आग लागल्याची घटना घडली. ही घटना समजताच तासगाव नगरपरिषदेची अग्निशमनची गाडी घटनास्थळी दाखल झाली. तिथे आगीवर नियंत्रण मिळवले. त्यावेळी आगीत होरपळून मयूर माळी याचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. माळी याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. त्यावेळी डोक्यात झालेल्या जखमा आणि घटनास्थळावरील परिस्थिती यामुळे पोलिसांचा मृत्यूबाबत संशय बळावला.

पोलीस उपअधीक्षक सचिन थोरबोले यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. यावेळी संशयास्पद गोष्टी आढळून आल्यानंतर मयूरची आई संगीता आणि बहीण काजल यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. या दोघींनी मयूरला शनिवारी गुंगीचे औषध दिले. तो गुंगीत असताना त्याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. 

संशयावरून छडा

मयूरचे आई आणि बहिणीसोबत काही कारणांवरून सातत्याने वाद होत होता. एकीचा पोटचा गोळा आणि दुसरीचा सख्खा भाऊ असतानाही मायलेकींनी मयूरचा खून केला. खून पचवण्यासाठी त्याच्या मृतदेहाला आग लावली. आगीत होरपळून मृत्यू झाल्याचा बनाव केला मात्र तासगाव पोलिसांनी संशयावरून आणि सतर्कतेमुळे बनाव उघडकीस आणला. दोघींनाही तात्काळ चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. मयूर याचे दोस्ती सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरू होते. त्याच्या खूनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
 

Web Title: Mother and sister murdered Mayur Mali, a youth, in Tasgaon, Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.