शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

मॉर्फिंगने मुलीचे न्यूड फोटो अपलोड केले, वडिलांनी चलाखीने पकडले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2018 15:46 IST

विनयभंग, धमकी देणे आणि  आयटी अॅक्टअंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला

मुंबई - मुंबईत साकिनाका पोलिसांनी पीडित मुलीच्या वडिलांच्या चलाखीने उत्तर प्रदेशमधल्या 31 वर्षांच्या तरूणाला बेड्या ठोकल्या आहे. मुंबईतल्या 22 वर्षांच्या एका तरूणीला तो त्रास देत होता. कृष्णा बघेल असे अटक केलेल्या आरोपीचं नाव असून त्यानं या मुलीचे फोटो मॉर्फ केलेली नग्न छायाचित्रे सोशल मीडियावर अपलोड केली होती असं साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर सावंत यांनी सांगितले. पीडित तरुणी आणि आरोपी यांच्यातील विवाहाचा प्रस्ताव मुलीनं फेटाळल्यानं तो तिला नाहक त्रास देत होता. मुलीला त्रास देणाऱ्या या आरोपीला पकडण्यासाठी तिच्या वडिलांनी चलाखीने सापळा रचला आणि त्याला अटक करण्यासाठी पोलिसांना मदत केली आहे.

आरोपी कृष्णाने या मुलीशी सहा महिन्यांपूर्वी फेसबुकवर मैत्री केली होती. आपण कलाकार असून आग्रा येथे राहतो आणि व्हिडिओ एडिटर असल्याचे त्याने बतावणी केली होती. नंतर त्याने या मुलीला लग्नाची मागणी घातली. मात्र, मुलीने ती मागणी फेटाळून लावली. त्यानंतर त्यांच्या दोघांचे संबंध बिघडले. पीडित तरुणीने नकार दिल्याने तिचा बदल घेण्यासाठी तिने एका भलत्याच मुलीच्या नग्न छायाचित्राला या मुलीचा चेहरा लावला आणि तो सोशल मीडियावर पसरवला. त्यामुळे या मुलीने पोलिस तक्रार केली. तसेच अनेकदा कृष्णाने पीडित तरुणीला धमकावले होते. 

नंतर पोलिसांनी व या मुलीच्या वडिलांनी मिळून सापळा रचला. वडिलांनी कृष्णाशी संपर्क साधला आणि आपण चित्रपट निर्माते असल्याचे सांगितले. तसेच आपण मै हू ऑटोवाला हा चित्रपट बनवत असून त्यात मुख्य कलाकाराची ऑफर देत असल्याचे कृष्णाला त्यांनी सांगितले. आनंदाने भरवलेल्या कृष्णाने लागलीच फेसबुकवर आपल्याला चित्रपटाची ऑफर आल्याचे व आपण मुंबईला जात असल्याचे सांगितले. 26 जुलै रोजी बघेल मुंबईला आल्या त्याचक्षणी त्याला पोलिसांनी  अटक केली. विनयभंग, धमकी देणे आणि  आयटी अॅक्टअंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असून 31 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असल्याचे सावंत यांनी पुढे सांगितले. 

टॅग्स :Crimeगुन्हाMumbaiमुंबईMolestationविनयभंगAndheriअंधेरीPoliceपोलिसArrestअटकUttar Pradeshउत्तर प्रदेश