संशयाच्या कारणावरून पतीचे राक्षसी कृत्य; पत्नीसह दोन मुलींना जिवंत जाळले; तिघींचा मृत्यू

By अण्णा नवथर | Published: March 25, 2024 02:00 PM2024-03-25T14:00:25+5:302024-03-25T14:01:44+5:30

सुनील लांडगे असे पतीचे नाव, नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथील घटना

Monstrous act of husband on grounds of suspicion; Two daughters along with wife were burnt alive; Death of all three | संशयाच्या कारणावरून पतीचे राक्षसी कृत्य; पत्नीसह दोन मुलींना जिवंत जाळले; तिघींचा मृत्यू

संशयाच्या कारणावरून पतीचे राक्षसी कृत्य; पत्नीसह दोन मुलींना जिवंत जाळले; तिघींचा मृत्यू

अण्णा नवथर/नागेश सोनवणे, अहमदनगर: संशयाच्या कारणावरून सुनील लांडगे याने त्याची पत्नी लिलाबाई आणि दोन मुलांना घरात जिवंत जाळले. नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा गावात ही घटना सोमवारी सकाळी नऊ वाजता घडली. नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथील लिलाबाई लांडगे आणि त्यांच्या दोन मुली घरात असताना पती सुनील लांडगे याने दोघांच्या अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळून दिले.  दारूच्या नशेत त्याने हे कृत्य केले. या घटनेत पत्नी लिलाबाई (२६), मुलगी साक्षी (१४), खुशी (९ महिने) या तिघींचा जळून मृत्यू झाला.

जे घर पेटवून दिले ते पत्र्याचे होते. ते जळून खाक झाले. आधीच उन्हाचा तडाखा व भडकलेली आग, तापलेले पत्रे अद्याप मृतदेह बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले मात्र दुपारपर्यंत हे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते.

या दरम्यान या घटनेमुळे पिंपळगाव सह नगर तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. ही घटना समजतात गावातील लोक आणि पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. सुनील लांडगे हा त्याच परिसरात दारूच्या नशेत आढळून आला. त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून  गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: Monstrous act of husband on grounds of suspicion; Two daughters along with wife were burnt alive; Death of all three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.