मोबाईलवर मेसेज आणि पाठलाग करून युवतीचा विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 15:39 IST2024-02-15T15:39:38+5:302024-02-15T15:39:47+5:30
याप्रकरणी पोलीसांनी आरोपी युवकांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाईलवर मेसेज आणि पाठलाग करून युवतीचा विनयभंग
खामगाव: शहरातील एका वस्तीत राहणाऱ्या एका युवतीच्या मोबाईलवर मेसेज आणि पाठलाग करून विनयभंग करण्यात आला. ही घटना गुरूवारी सकाळी उजेडात आली. याप्रकरणी पोलीसांनी आरोपी युवकांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, शहरातील एका वस्तीतील युवती घरकाम करते. दरम्यान, खामगाव जवळील एका गावातील युवक तिचा सतत पाठलाग करतो. तिला मोबाईलवर मेसेज पाठवितो. ही बाब तिने बुधवारी तिच्या घरच्यांना सांगितली. त्यानंतर शहर पोलीसांनी संबंधित युवका विरोधात भादंवि कलम ४५४ ड, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास खामगाव शहर पोलीस करीत आहेत.