शौचास जात असलेल्या तरुणीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 15:48 IST2019-07-09T15:45:16+5:302019-07-09T15:48:48+5:30
फिर्यादी तरुणी सोमवारी सायंकाळी पिंपरीतील नेहनरूनगर येथील सार्वजनिक शौचालयात शौचास जात होती.

शौचास जात असलेल्या तरुणीचा विनयभंग
पिंपरी : सार्वजनिक शौचालयात शौचास जात असताना तरुणीचा पाठलाग केला. तुझ्यासह घरच्यांकडे बघून घेईल, असे म्हणून विनयभंग केला. पिंपरीतील नेहरूननगर येथे सायंकाळी साडेपाचला हा प्रकार घडला. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शशिकांत आशिष गायकवाड (वय १८, रा. विठ्ठलनगर, पिंपरी) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी १८ वर्षीय पीडितेने फिर्याद दिली आहे.
फिर्यादी तरुणी सोमवारी सायंकाळी पिंपरीतील नेहनरूनगर येथील सार्वजनिक शौचालयात शौचास जात होती. त्यावेळी आरोपी शशिकांत गायकवाड याने तरुणीचा पाठलाग केला.माझ्याकडे खूप पैसा आहे. तू माझ्यासोबत फिरायला नाही आलीस तर मी तुझ्या व तुझ्या घरच्यांकडे बघून घेईल, असे म्हणून मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून आरोपी गायकवाड याने तरुणीचा विनयभंग केला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.