Molestation of a women by a video call | व्हिडिओ कॉल करत महिलेचा विनयभंग
व्हिडिओ कॉल करत महिलेचा विनयभंग

पिंपरी : महिलेच्या व्हॉट्स अ‍ॅप क्रमांकावर व्हिडिओ कॉल करून एका इसमाने अश्लील चाळे करत विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीतील पाषाण येथे घडली.
या प्रकरणी पीडित ३१ वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अंकुश नारायण दळवी यांच्या नावे मोबाइल क्रमांक असल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार (दि. ३ जुलै) सकाळी साडेआठच्या सुमारास पीडित महिला या राहत्या घरी घरकाम करत होत्या. या वेळी अंकुश नारायण दळवी यांच्या नावे असलेला मोबाइल वापरणाऱ्या इसमाने महिलेच्या व्हॉट्स अ‍ॅप क्रमांकावर वारंवार व्हिडिओ कॉल करून अश्लील चाळे करत विनयभंग केला. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेले नाही. पोलीस उपनिरीक्षक गोविंद पवार अधिक तपास करत आहेत.


Web Title: Molestation of a women by a video call
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.