१२ वर्षीय मुलीचा विनयभंग; आरोपीस अटक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 22:39 IST2022-07-20T22:38:59+5:302022-07-20T22:39:19+5:30
या प्रकरणी २० जुलै रोजी फिर्याद दाखल करण्यात आली असून आरोपी रिहानोद्दीन फकृद्दीन (२८) याला शहर पोलीसांनी अटक केली आहे.

१२ वर्षीय मुलीचा विनयभंग; आरोपीस अटक!
मूर्तिजापूर (जि. अकोला) : शहरातील जुने घरकुल येथे राहत असलेल्या एका १२ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना १९ जुलै रोजी घडली. या प्रकरणी २० जुलै रोजी फिर्याद दाखल करण्यात आली असून आरोपी रिहानोद्दीन फकृद्दीन (२८) याला शहर पोलीसांनी अटक केली आहे.
मूर्तिजापूर शहरातील जुने घरकूल परीसरातील एक १२ वर्षिय अल्पवयीन मुलगी घरासमोर उभी असताना त्याच परीसरात राहत असलेला आरोपी रिहानोद्दीन फकृद्दीन (२८) हा तिच्या जवळ येऊन तिच्याशी अश्लील चाळे करुन हात धरला व तिला मला तुझ्याशी लग्न करायचे आहे तु जर माझ्याशी लग्न केले नाही तर तुला जीवने मारुन टाकीन अशी धमकी आरोपीने दिली.
१९ जुलै रोजी रात्री घडलेल्या प्रकाराची फिर्याद २० जुलै रोजी मूर्तिजापूर शहर पोलीसात दाखल करण्यात आली. आरोपी विरुद्ध शहर पोलीसांनी कलम ३५४, व बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोस्को) तसेच फिर्यादी ही अनुसूचित जातीची असल्याने अनुसचीत जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे, या प्रकरणी शहर पोलिस अधिक तपास करीत आहेत.