पाणी भरण्यास गेलेल्या युवतीचा विनयभंग : तिघांविरुध्द गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 16:14 IST2018-09-19T16:14:34+5:302018-09-19T16:14:43+5:30

खामगाव : विहिरीवर पाणी भरण्यास गेलेल्या एका १९ वर्षीय युवतीचा हात पकडून विनयभंग करण्यात आला. ही घटना मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास अटाळी येथे घडली. 

Molestation of the girl FIR has been lodged against the three | पाणी भरण्यास गेलेल्या युवतीचा विनयभंग : तिघांविरुध्द गुन्हा दाखल

पाणी भरण्यास गेलेल्या युवतीचा विनयभंग : तिघांविरुध्द गुन्हा दाखल

खामगाव : विहिरीवर पाणी भरण्यास गेलेल्या एका १९ वर्षीय युवतीचा हात पकडून विनयभंग करण्यात आला. ही घटना मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास अटाळी येथे घडली.       तालुक्यातील अटाळी येथील १९ वर्षीय युवती गावातील विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेली होती. ही युवती एकटी असल्याचे पाहून  मंगेश अरुण गवई याने तिचा वाईट उद्देशाने हात पकडून विनयभंग केला. तर ही बाब कोणाला सांगितल्यास अरुण गवई व सौ. विजया अरुण गवई यांनी विहिरीत फेकून देण्याची धमकी दिली. अशी तक्रार अत्याचारग्रस्त युवतीने ग्रामीण पोलिसांना दिली. या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी कलम ३५४, ३५४ अ, ५०६, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला.

विवाहितेचा विनयभंग

घरासमोर कपडे वाळत घालत असलेल्या एका ३० वर्षीय विवाहितेचा विनयभंग झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. खामगाव तालुक्यातील तरोडा कसबा येथील विवाहिता कपडे वाळत घालत होती. दरम्यान, गौतम मनसाराम तेलेगोटे (४०) रा. तरोडा कसबा याने तिचा हात धरून विनयभंग केला. तोंडदाबून छेडखानी केली. ही घटना कोणाला सांगितल्यास आपल्या मुलास आणि पतीस जीवे मारण्याची धमकी दिली. अशी तक्रार विवाहितेने  १८ सप्टेंबर रोजी साडेसहा वाजताच्या वाजताच्या सुमारास दिलीे. यावरुन ग्रामीण पोलिसांनी उपरोक्त आरोपीविरुध्द भादंवि कलम ३५४, ३५४ अ, ५०६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला. 

Web Title: Molestation of the girl FIR has been lodged against the three