शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मोहफुल दारू विक्रेत्यांची पोलिसांना धक्काबुक्की, आरोपी पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 17:17 IST

Crime News : सावली येथून जवळच असलेल्या किसाननगर येथे गस्तीवर असलेल्या पोलिसांना एक जण प्लास्टिकच्या डबकीमध्ये दारू नेत असल्याचा संशय आला.

ठळक मुद्देआकाश गरीबचन्द मजोके (30),  सुमित गरीबचन्द मजोके (35) गरीबचन्द मजोके (56) आणि अन्य सर्व रा. किसाननगर ता सावली अशी मोहफूल दारू विक्रेत्या आरोपींची  नावे आहेत.

चंद्रपूर : दारू पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना दारूविक्री करणाऱ्यांनी धक्काबुक्की केल्याची घटना सावली तालुक्यातील किसाननगर येथे घडली. दरम्यान, पोलिसांच्या भीतीपोटी धक्काबुक्की करणारे दारू विक्रेते घटनास्थळावरून पसार झाले. एकाच कुटुंबातील वडील व दोन मुलांसह अन्य आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे. आकाश गरीबचन्द मजोके (30),  सुमित गरीबचन्द मजोके (35) गरीबचन्द मजोके (56) आणि अन्य सर्व रा. किसाननगर ता सावली अशी मोहफूल दारू विक्रेत्या आरोपींची  नावे आहेत.

सावली येथून जवळच असलेल्या किसाननगर येथे गस्तीवर असलेल्या पोलिसांना एक जण प्लास्टिकच्या डबकीमध्ये दारू नेत असल्याचा संशय आला. लगेच पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला. पोलिसांनी संबंधिताला पकडले. तेव्हा कारवाईच्या भीतीपोटी पैसे घ्या पण सोडा, अशी विनंती तो करू लागला. मात्र पोलिसांनी मान्य न केल्याने त्या इसमाने आपल्या कुटुंबातील सदस्यांना बोलावून पोलिसांना धक्काबुक्की करून घटनास्थळावरून धूम ठोकली. 

या घटनेनंतर सावलीतून पोलीस ताफा घटनास्थळावर दाखल झाला. आरोपींचा शोध लागला नाही. अखेर पोलिसांनी आरोपींविरुद्ध 354, 324, 323, 504, 506,34 भादंवी सहकलम 65 व 83 दारुबंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस तपास सुरु आहे. किसाननगर येथून सावली तालुका परिसरात मोठ्या प्रमाणात मोहफुलाच्या दारुचा पुरवठा होत असल्याचे समजते. संबंधित दारू विक्रेते पोलिसांना जुमानत नसल्याची चर्चा आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसliquor banदारूबंदी