मोबाइल टॉर्चचा प्रकाश चेहऱ्यावर मारल्याच्या रागात तरुणाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 01:29 IST2020-03-09T01:29:15+5:302020-03-09T01:29:42+5:30

चौहान हा मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. चौहानने आरोपीच्या चेहºयावर मोबाइल टॉर्चचा प्रकाश मारल्याच्या रागात दोघांमध्ये भांडण झाले

Mobile torch kills youth in anger | मोबाइल टॉर्चचा प्रकाश चेहऱ्यावर मारल्याच्या रागात तरुणाची हत्या

मोबाइल टॉर्चचा प्रकाश चेहऱ्यावर मारल्याच्या रागात तरुणाची हत्या

मुंबई : मोबाइल टॉर्चची लाइट चेहºयावर मारल्याच्या रागात अभिषेक चौहान (२८) याला चौथ्या माळ्यावरून लिफ्टच्या डकमध्ये ढकलल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. यात तरुणाचा मृत्यू झाला असून, या प्रकरणी आरोपीला हत्येच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

चौहान हा मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. चौहानने आरोपीच्या चेहºयावर मोबाइल टॉर्चचा प्रकाश मारल्याच्या रागात दोघांमध्ये भांडण झाले. शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मालाड येथील पठाणवाडीतील शीतल तपोवन इमारतीत असताना दोघांमध्ये वाद झाले. यातूनच आरोपीने त्याला चौथ्या माळ्यावरून लिफ्टच्या डकमध्ये ढकलले.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी चौहानला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. त्यानुसार, तक्रारीनंतर या प्रकरणी वैभव गोरडच्या तक्रारीवरून शनिवारी २४ वर्षीय आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी कुरार पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Mobile torch kills youth in anger

टॅग्स :Murderखून