सनबर्न फेस्टिव्हलच्या काळात मोबाइल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 19:02 IST2019-12-30T19:01:45+5:302019-12-30T19:02:34+5:30
अटक केलेल्या चार जणांकडून पोलिसांनी १० लाख रुपये किंमतीचे ५४ मोबाइल हस्तगत

सनबर्न फेस्टिव्हलच्या काळात मोबाइल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
म्हापसा : सनबर्नच्या काळात लोकांचे महागाडे मोबाइल चोरणाऱ्या एका दिल्लीतील टोळीला कळंगुट पोलिसांनी गजाआड केले आहे. अटक केलेल्या चार जणांकडून पोलिसांनी १० लाख रुपये किंमतीचे ५४ मोबाइल हस्तगत केले आहेत.
कळंगुट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वासिम अहमद (२८), महंमद जामील (२९), अनिश सुलेमान (५०), लाल मोहम्मद (४०) या चारही संशयीतांना कळंगुट पोलिसांनी अटक केली आहे. निरीक्षक नोलास्को रापोझ यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या कारवाईत उपनिरीक्षक विराज नाईक, कॉन्स्टेबल विनय श्रीवास्तव, सुरेश नाईक, राहुल रामनवार, विनोद नाईक यांचा यात समावेश आहे. पुढील तपास अधीक्षक उत्कृष्ट प्रसून तसेच उपअधीक्षक अॅडविन कुलासो यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.