दुकान फोडून मोबाईल चोरी करणारा चोरटा जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 18:30 IST2019-01-31T18:29:46+5:302019-01-31T18:30:46+5:30
सॅमसंग, विवो, ओपो, कंपनीचे एकूण ८ मोबाईल फोन, डी.व्ही.आर आणि रोख रक्कम १३,१०० असा एकूण १,२७,९३५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

दुकान फोडून मोबाईल चोरी करणारा चोरटा जेरबंद
ठळक मुद्देरवी मनोहरलाल रोहरा या व्यक्तीने संबंधित चोरी झाल्याची तक्रार केली होती.उल्हासनगर पोलिसांनी अल्पवयीन मुलास १७ सेक्शन चौक उल्हासनगर मोबाईल मार्केट येथून अटक केली.
ठाणे - मोबाईल दुकान फोडून मोबाईल चोरी करणाऱ्या एका अल्पवयीन मुलास उल्हासनगर पोलिसांनीअटक केली आहे. आरोपी अल्पवयीन आहे.
रवी मनोहरलाल रोहरा या व्यक्तीने संबंधित चोरी झाल्याची तक्रार केली होती. या तक्रारीवरून आणि मिळालेल्या माहितीवरून उल्हासनगर पोलिसांनी अल्पवयीन मुलास १७ सेक्शन चौक उल्हासनगर मोबाईल मार्केट येथून अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याची झडती घेतली असता सॅमसंग, विवो, ओपो, कंपनीचे एकूण ८ मोबाईल फोन, डी.व्ही.आर आणि रोख रक्कम १३,१०० असा एकूण १,२७,९३५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या गुन्ह्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.