11 लाखांचे ६३ मोबाईल पोलिसांनी केले हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 08:33 PM2019-11-12T20:33:24+5:302019-11-12T20:49:10+5:30

आरोपींचे इतर साथीदारांचा शोध सुरु आहे.

Mobile phones of 11 lakh were seized by police | 11 लाखांचे ६३ मोबाईल पोलिसांनी केले हस्तगत

11 लाखांचे ६३ मोबाईल पोलिसांनी केले हस्तगत

Next
ठळक मुद्देचोरी  केलेले मोबाईल हे आरोपी नेपाळ, बांगलादेश या ठिकाणी विक्रीसाठी पाठवत असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. सापळा रचून आरोपी कुंदनकुमार अर्जून महतो (वय 21 ) राहणार झारखंड याला पोलिसांनी अटक केली.

पनवेलपनवेल शहर पोलीस ठाण्यात हा 28 ऑक्टोबर महिन्यात मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याअंतर्गत पोलिसांनी पथकाने तात्काळ सदर परिसरात सापळा रचून आरोपी कुंदनकुमार अर्जून महतो (वय 21 ) राहणार झारखंड याला पोलिसांनी अटक केली.

 त्यानंतर २४ तासात पनवेल व गुजरातमधून एकूण 63 मोबाईल फोन - आय फोन, सॅमसंग, विवो, ओप्पो, एमआय, लेनोवो, मोटरोला, इत्यादी कंपनीचे एकूण 11 लाख 10 हजार रुपये किंमतीचे मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत. अटक आरोपी हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याचा साथीदार नामे आझम जेक्कु शेख, यास  झारखंड  येथून सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. चोरी  केलेले मोबाईल हे आरोपी नेपाळ, बांगलादेश या ठिकाणी विक्रीसाठी पाठवत असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. आरोपींचे इतर साथीदारांचा शोध सुरु आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शानुसार सदर कारवाई पनवेल शहर पोलीस ठाण्याचे सपोनि ईशान खरोटे, पोलीस हवालदार दिलीप चौधरी, पोलीस नाईक दिनेश जोशी, पंकज पवार,  पोलीस शिपाई राहुल साळुंके, अजय कदम, राजू खेडकर यांच्या पथकाने केली आहे.

Web Title: Mobile phones of 11 lakh were seized by police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.