शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
2
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
3
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
4
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
5
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
6
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
7
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
8
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
9
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
12
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
13
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
14
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
15
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
16
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
17
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
18
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
19
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
20
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!

मोबाईलचे वेड नडले! बारावीच्या विद्यार्थ्याची गळफास लावून केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 20:27 IST

Suicide : भावेशला त्याच्या आईवडिलांनी क्रॅश कोर्ससाठी औरंगाबादला पाठवले होते.

ठळक मुद्देठाणेदार सत्यवान माने यांनी भावेशच्या आत्महत्येमागचे कारण जाणून घेण्यासाठी त्याच्या पालकांशी चर्चा केली.

नागपूर : मोबाईलचे वेड जडलेल्या एका विद्यार्थ्यांने गळफास लावून आत्महत्या केली. भावेश नरेंद्र चीतमलकर असे त्याचे नाव आहे. १७ वर्षीय भावेश बारावीचा विद्यार्थी होता. त्याचे आई-वडील शिक्षक असून बहीण वैद्यकीय क्षेत्रात काम करते. सक्करदरा येथील दत्तात्रयनगरात चितमलकर कुटुंबीय राहत होते. भावेशला त्याच्या आईवडिलांनी क्रॅश कोर्ससाठी औरंगाबादला पाठवले होते.

लॉकडॉउनमुळे तो औरंगाबादहुन नागपुरात परतला. घरी आल्यानंतर तो सारखा मोबाईल मध्ये गुंतून राहायचा. आईवडील त्याला याबाबत विचारणा करीत होते. मात्र तो वेळ मारून न्यायचा. गुरुवारी रात्री भावेशचे आईवडील त्यांच्या नातेवाईकांकडे गेले होते. रात्री ९ च्या सुमारास बहिण घरी परतली. तेव्हा भावेश त्याच्या शयनकक्षात गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला. तिने आपल्या आई-वडिलांना माहिती देऊन घरी बोलवून घेतले. त्यानंतर भावेशला डॉक्टरकडे नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. माहिती कळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. भावेशच्या आत्महत्येमागचे कारण जाणून घेण्यासाठी त्यांनी त्याच्या रूमची आणि बॅगची तपासणी केली. मात्र सुसाईड नोट अथवा असे काहीही आढळून आले नाही. त्यामुळे त्याने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे तूर्त गुलदस्त्यात आहे.

ठाणेदार सत्यवान माने यांनी भावेशच्या आत्महत्येमागचे कारण जाणून घेण्यासाठी त्याच्या पालकांशी चर्चा केली. मात्र त्यांच्याकडूनही कारण स्पष्ट होऊ शकले नाही. त्याने मोबाईल गेमच्या नादातून आत्महत्या केली का, असा प्रश्न केला असता पोलिसांनी त्याबाबत ठोस उत्तर देता येणार नाही, असे म्हटले.

टॅग्स :Studentविद्यार्थीnagpurनागपूरPoliceपोलिसMobileमोबाइल