जी साऊथ वॉर्डमध्ये मनसे, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना केली मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 18:11 IST2019-01-21T18:07:56+5:302019-01-21T18:11:16+5:30
एल्फिन्स्टन पुलाखाली शिवसेनेच्या प्रस्तावित शौचालयाला मनसे आणि राष्ट्रवादीचा विरोध करत ही मारहाण केली.

जी साऊथ वॉर्डमध्ये मनसे, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना केली मारहाण
मुंबई - पालिकेच्या जी साऊथ वॉर्डमध्ये आज दुपारी मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आहे. या कार्यकर्त्यांची पालिकेच्या अभियंता सुशांत गोडबोले आणि सहाय्यक अभियंता रवी म्हस्के यांना मारहाण केली आहे. सार्वजनिक शौचालय बांधकामप्रकरणी मनसे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हा राडा केला असून दोन अधिकाऱ्यांना बेदम मारहाण केली आहे.एल्फिन्स्टन पुलाखाली शिवसेनेच्या प्रस्तावित शौचालयाला मनसे आणि राष्ट्रवादीचा विरोध करत ही मारहाण केली.
मुंबई - पालिकेच्या जी साऊथ वॉर्डमध्ये गोंधळ; मनसे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची अभियंता सुशांत गोडबोले, सहाय्यक अभियंता रवी म्हस्के यांना मारहाण
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) January 21, 2019