शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

आमदार अनिल भोसले यांचा जामीन दुसऱ्यांदा फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 19:26 IST

शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी 16 जणांवर गुन्हा दाखल..

पुणे : शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी येरवडा कारागृहात असलेले आमदार अनिल भोसले यांचा जमीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळण्यात आला आहे. हा निर्णय अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. व्ही. रोट्टे यांनी दिला. यापूर्वी एप्रिल महिन्यात अनिल भोसले यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. आता गुन्हे शाखेने दोषारोप पत्र दाखल केल्यानंतरही त्यांनी केलेला दुसरा जामीन अर्जही न्यायालयाने फेटाळला आहे.याप्रकरणी योगेश लकडे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे संचालक व अधिकारी अशा १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या अनिल भोसले हे न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्या जामीन अर्जावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.व्ही.रोट्टे यांच्यासमोर सुनावणी झाली. अनिल भोसले यांच्याविरोधात प्रथमदर्शनी पुरावा नाही. अर्जदारावर ४५ कोटी रुपयांची जबाबदारी दोषारोपपत्रात निश्चित करण्यात आली आहे. त्याबदल्यात त्यांची १९० कोटी रुपयांची मालमत्ता तारण देण्याची तयारी आहे. जर त्यांची सुटका झाली तर ते गुंतवणुकदारांना त्यांचे पैसे परत करण्यासाठी पैशांची व्यवस्था करुन शकतील. आम्ही १० कोटी रुपये भरायला तयार आहोत, असा युक्तीवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आला. आरोपीविरोधात प्रथमदर्शनी सबळ पुरावा आहे. १० कोटी रुपयांतून काहीच साध्य होणार नाही. जप्त करण्यातआलेल्या मालमत्तेची किंमत फुगवण्यात आली आहे. पुराव्यात हस्तक्षेप होण्याची शक्यता असल्याने त्यांचा जामीन फेटाळण्यात यावा, अशी मागणी गुंतवणुकदारांचे वकील सागर कोठारी यांनी केली. अतिरिक्त सरकारी वकील विलास पठारे यांनी बाजू मांडली.फॉरेन्सिंक आॅडिट सुरु असून त्यात प्रगती दिसून येत आहे. आरोपीला साक्षीदार हे सहजपणे उपलब्ध होऊ शकतील.वसुल करायची रक्कम मोठी असल्याने व प्रथर्मदर्शनी पुरावा उपलब्ध आहे. त्यात हस्तक्षेप होण्याची शक्यता असल्याचा सरकार पक्षाचा युक्तीवाद मान्य करुन न्यायालयाने अनिल भोसले यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

टॅग्स :PuneपुणेArrestअटकCourtन्यायालयbankबँकfraudधोकेबाजी