शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
3
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
4
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
5
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
6
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
7
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
10
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
11
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
12
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
13
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
14
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
15
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
16
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
17
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
18
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
19
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
20
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?

सोशल मीडियाचा गैरवापर वाढला; अश्लील छायाचित्र प्रसारित करणाऱ्यांविरुद्ध सर्वाधिक गुन्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 10:18 AM

पुणे शहरात दोन वर्षांत ८० गुन्हे दाखल

- नारायण बडगुजरपिंपरी : सोशल मीडियाचा गैरवापर होत असल्याने सायबर गुन्ह्यांमध्ये वाढत होत आहे. गतवर्ष कोरोना महामारी तसेच लाॅकडाऊनमध्ये गेले. असे असतानाही सोशल मीडियाव्दारे गुन्हेगारी कृत्ये झाली. पिंपरी-चिंचवड शहरात २०१९ मध्ये ३६ तर २०२० मध्ये ४४ गुन्हे दाखल झाले आहेत. यात सोशल मीडियाव्दारे अश्लील मेसेज करणे, व्हिडीओ व फोटो व्हायरल करण्याचे प्रकार जास्त आहेत.  

स्मार्ट फोनमुळे सोशल मीडियाच्या वापरकर्त्यांमध्ये वाढ होत आहे. मात्र त्याच तुलनेत सोशल मीडियाचा गैरवापर देखील होत आहेत. चोरटे देखील ‘स्मार्ट’ होत असून, त्यांनी चोरीची पद्धत बदलली आहे. सोशल मीडियाव्दारे विविध अ‍ॅप्सचा वापर करून ऑनलाईन फसवणूक केली जात आहे. तसेच खरेदी विक्रीच्या बहाण्याने क्यूआर कोड स्कॅन करण्यास सांगून गंडा घातला जात आहे. पिंपरी-चिंचवड उद्योगनगरी असल्याने येथील कंपन्यांना तसेच खासगी आस्थापनांना बनावट इमेल आयडीवरून गंडा घालण्यात आल्याचे गुन्हे घडले. 

डेटिंग अ‍ॅपवरून मैत्री करून अत्याचाराच्याही घटना घडल्या आहेत. तसेच अश्लील फोटो व व्हिडीओ तयार करून ते प्रसारीत केल्याचेही प्रकार आहेत. ओळखीच्या व्यक्ती किंवा नातेवाईकांकडून असे प्रकार होण्याचे प्रमाण जास्त आहे. फेसबुकवरूनही अशा पद्धतीने बालकांचे फोटो अपलोड करण्यात आल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गुन्हे दाखल झाल्यानंतर पुढे काय?

कंपन्यांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलने पैसे परत मिळविण्यासाठी प्रयत्न केले. त्यानुसार परदेशातील बॅंकांच्या माध्यमातून झालेल्या व्यवहारांना थांबवून तक्रारदारांचे लाखो रुपये परत मिळविण्यात आले. 

पोलीस अधिकाऱ्यांच्या नावे बनावट अकाऊंट

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यासह इतर काही अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून फेसबुकवर बनावट अकाऊंट तयार केल्याचे प्रकार उघडकीस आले. या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्यांच्या फेसबुकवरील फ्रेंडला रिक्वेस्ट पाठविण्यात येते. त्यानंतर पैशांची मागणी करण्यात येते. 

सोशल मीडियाचा वापर केल्याप्रकरणी दाखल गुन्हे२०१९ - ३६२०२० - ४४

कुठल्या महिन्यात सर्वाधिक गुन्हे (२०२०)महिना          गुन्हे संख्याजानेवारी  - ७फेब्रुवारी - १२मार्च - ७एप्रिल - ००मे - ००जून - ३जुलै - ४ऑगस्ट - ००सप्टेंबर - २ऑक्टोबर - ६नोव्हेंबर - ३डिसेंबर - ००

टॅग्स :PoliceपोलिसPuneपुणे