शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
3
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
4
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
5
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
6
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
7
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
8
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
9
मोठी बातमी : यजमान वेस्ट इंडिजने अखेरच्या क्षणाला संघ बदलला, अनुभवी खेळाडूची स्पर्धेतून माघार   
10
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
11
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
12
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून बेपत्ता झालेले फौजदार चेरले सापडले नांदेडच्या दवाखान्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 11:26 AM

बाळापुर पोलीस ठाण्यातील फौजदार तानाजी चेरले हे वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून बेपत्ता झाले होते

आखाडा बाळापूर( हिंगोली) : बाळापुर पोलीस ठाण्यातील फौजदार तानाजी चेरले हे वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून बेपत्ता झाले होते. त्यामुळे पोलिस दलात एकच खळबळ माजली होती. अखेर बेपत्ता फौजदार  नांदेडच्या एका खाजगी दवाखान्यात उपचार घेतांना मिळून आले असून कळमनुरीचे ठाणेदार गणपत राहिरे यांनी यांचा शोध लावला आहे.

आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक तानाजी चेरले हे दिनांक दहा पासून अचानक गायब झाले होते. त्यांच्या अचानक निघून जाण्यामुळे पोलीस ठाण्यात एकच खळबळ माजली होती. तानाजी चेरले यांच्या पत्नी सरस्वती चेरले यांनी आपले पती बाळापूर चे ठाणेदार व्यंकटेश केंद्रे यांच्या त्रासाला कंटाळून घर सोडून निघून गेल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हिंगोली पासुन ते मुंबईपर्यंतच्या पोलीस दलामध्ये एकच खळबळ माजली होती. 

फौजदार चेरले निघून जाण्यामागचे अनेक तर्कवितर्क लढविले जात होते. अनेक शंका उपस्थित केल्या जात होत्या. आता त्या शंकांचे निरसन होणार आहे. कळमनुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणपत राहिरे यांनी बेपत्ता फौजदाराचा  शोध लावला. नांदेड येथील तरोडा नाका भागात असलेल्या सिटी हॉस्पीटलमध्ये तानाजी चेरले उपचार घेत असल्याची खबर मिळाल्यावर नुसार फौजदार चेरले यांना आणण्यासाठी गणपत राहिरे यांनी मध्यरात्रीच नांदेड गाठले. दवाखान्यातून डिस्चार्ज घेऊन  सकाळी चार वाजता त्यांना घेऊन कळमनुरी येथे हजर झाले आहेत .थोड्याच वेळात पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्यासमोर फौजदार केरले यांना उपस्थित केले जाणार असून त्यानंतरच या प्रकरणाचे गूढ उकलणार आहे. 

टॅग्स :HingoliहिंगोलीPoliceपोलिसNandedनांदेड