शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
4
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
5
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
7
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
8
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
10
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
11
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
12
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
13
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
16
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
17
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
18
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
19
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

बेपत्ता चिमुरडीची लैंगिक अत्याचारानंतर हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 5:45 AM

डोक्यावरच्या गोणीमुळे गुन्ह्याचा उलगडा

मुंबई : घराबाहेर खेळत असताना बेपत्ता झालेल्या ७ वर्षीय चिमुरडीची लैंगिक अत्याचारानंतर हत्या केल्याची माहिती आरोपीच्या अटकेनंतर समोर आली आहे. रविवारी वाडी बंदर येथे रेल्वे रुळात फेकलेल्या एका गोणीतून तिचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला.डोंगरी परिसरात ७ वर्षीय चिमुरडी कुटुंबियासोबत राहायाची. ३० मे रोजी रात्री साडे नउच्या सुमारास ती बेपत्ता झाल्याने कुटुंबियांनी तिचा शोध सुरु केला. अखेर, तिचा कुठेच थांगपत्ता न लागल्याने कुटुंबियांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केला.घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, पथकाने सीसीटिव्हीची मदतीने तपासणी सुरु केली. बऱ्याच तपासणी नंतर एका सीसीटिव्हीमध्ये एक तरुण चिमुरडीसोबत एक मिनिट बोलताना दिसला. पोलिसांनी तोच धागा पकड़ून शोध सुरु केला. पुढे त्याच दिवशी तोच तरुण रात्री डोक्यावर गोणी घेवून जाताना दिसल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी तरुणाचा शोध घेतला असता, त्याचे नाव रिझवान क़ुतबुद्दीन शेख (२२) असून तो परिसरालगत असलेल्या एका इमारतीत आचारी म्हणून काम करत असल्याचे लक्षात आले. त्यानुसार पोलिसांनी शेखचा तपास सुरु केला. तेव्हा तो मित्राच्या तिकीटावर गावी गेल्याचे समोर आले. पथकाने त्याच्या गावी निरोप धाङताच, १३ तारखेला तो पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याच्याकडे केलेल्या चौकशी त्याने हत्येची कबुली दिली. आणि गावी जाण्यापूर्वी मृतदेह वाडी बंदर रेल्वे ट्रॅक शेजारी तंबाखु गल्लीच्या आतील रोडमध्ये फेकल्याचे सांगितले. त्यानुसार रविवारी चिमुरडीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेत, शवविच्छेदनास पाठविला आहे.शनिवारपर्यंत कोठडीलैंगिक अत्याचारानंतर तिची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. सध्या हत्या, पॉक्सोच्या गुन्ह्यांत शेखला अटक केली असून, २० तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.