वसई-विरार महापालिकेचे सहाय्यक आयुक्त बेपत्ता झाल्याने खळबळ; दोन दिवस संपर्क नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 16:19 IST2021-06-04T16:04:57+5:302021-06-04T16:19:49+5:30
Missing of Assistant Commissioner of Vasai-Virar Municipal Corporation : जाधव हे अचानक बेपत्ता झाल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांना बेपत्ता केले की बेपत्ता झाले, याविषयी पोलीस तपास करीत आहेत.

वसई-विरार महापालिकेचे सहाय्यक आयुक्त बेपत्ता झाल्याने खळबळ; दोन दिवस संपर्क नाही
नालासोपारा : वसई-विरार महापालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रेमसिंग जाधव गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता आहेत. महानगरपालिकेत मागच्या एक वर्षापासून कोरोना रुग्णांची विल्हेवाट लावण्याचा प्रभारी पदभार प्रेमसिंग जाधव यांच्याकडे होता.
जाधव यांनी सहाय्यक आयुक्तपदावर काम करताना वसई-विरार शहरातील अनेक अनधिकृत बांधकामेही भुईसपाट केलेली आहेत. दोन जून रोजी कामावरून सुटल्यानंतर ते घरी परतलेच नाहीत. याबाबत विरार पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबियांकडून देण्यात आली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमसिंग जाधव यांचे शेवटचे लोकेशन विरार रेल्वे स्थानकातले असल्याचे समजले असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. जाधव हे अचानक बेपत्ता झाल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांना बेपत्ता केले की बेपत्ता झाले, याविषयी पोलीस तपास करीत आहेत.
ऑपरेशनदरम्यान डॉक्टरांनीच केला तरूणीवर सामूहिक बलात्कार; भावाची मदतीसाठी विनवणीhttps://t.co/Iv0UWOOt7j
— Lokmat (@MiLOKMAT) June 3, 2021
जेलमध्ये जाण्याची होती हौस; त्यानं पोलिसांना कॉल करून दिली थेट पंतप्रधानांना मारण्याची धमकी अन्...https://t.co/CE4knNBV4t
— Lokmat (@MiLOKMAT) June 4, 2021