Video - खळबळजनक! 'ते' दोघं अचानक पिझ्झा शॉपमध्ये घुसले, धमक्या देत केली लूटमार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 13:05 IST2024-03-09T12:58:20+5:302024-03-09T13:05:11+5:30
दुकानदार आणि ग्राहकाची रोकडही हिसकावण्यात आली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

Video - खळबळजनक! 'ते' दोघं अचानक पिझ्झा शॉपमध्ये घुसले, धमक्या देत केली लूटमार
उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये शस्त्राच्या जोरावर दरोडा टाकण्यात आला आहे. दोन गुन्हेगारांनी पिझ्झा शॉपमध्ये घुसून लुटमार केली. ही संपूर्ण घटना दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यामध्ये एकाने हेल्मेट घातलं आहे, तर दुसऱ्याने तोंडाला टॉवेल बांधला आहे. गुन्हेगाराच्या हातात शस्त्र पाहून दुकानात बसलेले ग्राहकही घाबरतात.
ही संपूर्ण घटना लोणी बॉर्डर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंदिरापुरी भागात असलेल्या एका पिझ्झा शॉपमध्ये घडली आहे. काल सायंकाळी चोरट्यांनी दरोडा टाकला. दोन्ही चोरटे स्कूटरवरून दुकानाबाहेर पोहोचले होते. एकाने ओळख लपवण्यासाठी हेल्मेट घातले होते. त्याच्या हातात शस्त्रही होते. तर दुसऱ्याने तोंडाला टॉवेल बांधला होता. तो लोकांना धमक्या देत होता.
यूपी के गाजियाबाद में 2 बदमाश एक पिज्जा शॉप में पहुंचे.
— Ranvijay Singh (@ranvijaylive) March 9, 2024
पिस्टल निकाली और दुकान और कस्टमर्स से पैसे लूटकर चले गए.
गनीमत रही कोई बड़ी घटना नहीं हुई. pic.twitter.com/6wecGd5GEy
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोघं जण कशाप्रकारे दुकानात लूट करत आहेत. त्यांनी पिझ्झा शॉपमध्ये बंदुकीच्या धाकावर लोकांना ओलीस ठेवलं. त्यानंतर दुकानदार आणि ग्राहकाची रोकडही हिसकावण्यात आली. लोकांना धमकावत आहे, तर दुसरा शस्त्राच्या धाक दाखवून दुकानदाराच्या पाकिटातून रोख रक्कम लुटत आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
पोलीस अधिक तपास करत आहेत. हल्लेखोरांना पकडण्यासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत. लवकरच अटक करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दुकानदाराने सांगितले की, ते लोक कोण आहेत हे मला माहीत नाही. त्याचा चेहरा झाकलेला होता. आत शिरताच त्यांनी लूटमार सुरू केली. सर्व काही सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाले आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.