शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

लॉकडाऊनमध्ये मीरा भाईंदर पोलिसांचा वाहन जप्तीचा धडाका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2020 23:59 IST

एका दिवसात तब्बल १६० वाहनं जप्त करत २३ सामुहिक गुन्हे दाखल

ठळक मुद्देसर्वात जास्त ६७ वाहनं भाईंदर पोलीसांनी जप्त केली आहेत.एका दिवसात ६५ दुचाकी व २ रिक्षा अशी ६७ वाहनं जप्त करुन ६ सामुहिक गुन्हे दाखल केले आहेत.

मीरारोड - कोरोनाचा संसर्ग पसरु नये म्हणून मीरा भाईंदरमध्ये ठाणे ग्रामीण पोलीसांनी आता बेशिस्त लोकांवर कारवाईचा धडाका सुरु केला आहे. गुरुवारी एका दिवसात परवाना नसताना वाहनं घेऊन फिरणाऱ्या १५० पेक्षा जास्त लोकांवर सामुहिक २३ गुन्हे दाखल करत १५७ दुचाकी व ३ रिक्षा अशी १६० वाहनं जप्त केली आहेत. सर्वात जास्त ६७ वाहनं  भाईंदर पोलीसांनी जप्त केली आहेत.शहरात जीवनावश्यक तसेच अत्यावश्यक सेवा वगळता अनेक बेशिस्त लोकं बंदी असून देखील सर्रास वाहनं घेऊन फिरत असल्याने त्यांना आळा घालण्यासाठी ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारच्या दुचाकी, तीनचाकी, कार आदी वाहनांना रस्त्यावर आणण्यास बंदी घालण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना सादर केला होता. पोलीसांचा हा प्रस्ताव जिल्हाधिकारायांनी मंजुर केला.जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहन बंदीच्या आदेशानंतर डॉ. राठोड व अपर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात वाहनांवर कारवाईची धडक मोहिम सुरु करण्यात आली आहे.

भाईंदर विभागीय हद्दीत उपअधीक्षक शशिकांत भोसले तर मीरारोड उपअधीक्षक शांताराम वळवींनी कारवाईचे नियोजन केले.  भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह एका दिवसात ६५ दुचाकी व २ रिक्षा अशी ६७ वाहनं जप्त करुन ६ सामुहिक गुन्हे दाखल केले आहेत.

नवघरचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश बिराजदार यांनी ६१ दुचाकी जप्त करुन १ सामुहिक गुन्हा दाखल केला. उत्तन सागरी पोलीस ठाण्याचे सतिश निकम यांनी ४ दुचाकी जप्त व १ गुन्हा ; काशिमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय हजारे यांनी १० दुचाकी व १ रिक्षा जप्त करुन ४ गुन्हे ; नया नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कैलास बर्वे यांनी १५ दुचाकी जप्त करुन १ गुन्हा तर मीरारोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदिप कदम यांनी २ दुचाकी जप्त करुन ३ गुन्हे दाखल केले आहेत.शहरातील सदर ६ पोलीस ठाण्यांनी नाकाबंदी करुन ही कारवाईची मोहिम सुरु केली असुन मोठ्या संख्येने दुचाकी वाहनं जप्त करुन गुन्हे दाखल केल्याने बेशिस्तां मध्ये घबराट माजली आहे. भाईंदर व नवघर पोलीस ठाण्याचा परिसर तर जप्त केलेल्या दुचाकींनी तुडुंब भरुन गेला होता. वाहन सोडवण्यासाठी पकडले गेलेले बेशिस्त पोलीसांकडे गयावया करत होते. सदरची कारवाई रोज सुरुच राहणार असल्याचे उपअधीक्षक भोसले यांनी सांगितले.

टॅग्स :PoliceपोलिसMira Bhayanderमीरा-भाईंदरtwo wheelerटू व्हीलरfour wheelerफोर व्हीलर