शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2019 8:09 PM

शाळेत सोडतो असे सांगून बारा वर्षीय मुलीला टेम्पोत नेत दोघांनी तिचा विनयभंग केला.

पिंपरी : शाळेत सोडतो असे सांगून बारा वर्षीय मुलीला टेम्पोत नेत दोघांनी तिचा विनयभंग केला. याप्रकरणी शौकत अजमेर शेख (वय १९) व अमोल चंद्रकांत इंगवले (वय २१, दोघेही रा. अप्पा इंगवले चाळ, इंगवलेनगर, पिंपळे निलख)या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. गुरुवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास फिर्यादी महिलेची बारावर्षीय मुलगी शाळेत निघाली होती. शौकत शेख याने मुलीला शाळेत सोडतो,असे सांगितले. त्यानंतर टेम्पोतून पुण्यातील शनिवारवाडा येथे घेऊन गेले. या वेळी अमोल इंगवलेही टेम्पोत होता. या प्रवासात आरोपींनी अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन करत विनयभंग केला. याप्रकरणी आरोपींवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMolestationविनयभंगPoliceपोलिस