शाळेत सोडण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 20:10 IST2019-01-04T20:09:27+5:302019-01-04T20:10:51+5:30
शाळेत सोडतो असे सांगून बारा वर्षीय मुलीला टेम्पोत नेत दोघांनी तिचा विनयभंग केला.

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग
पिंपरी : शाळेत सोडतो असे सांगून बारा वर्षीय मुलीला टेम्पोत नेत दोघांनी तिचा विनयभंग केला. याप्रकरणी शौकत अजमेर शेख (वय १९) व अमोल चंद्रकांत इंगवले (वय २१, दोघेही रा. अप्पा इंगवले चाळ, इंगवलेनगर, पिंपळे निलख)या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. गुरुवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास फिर्यादी महिलेची बारावर्षीय मुलगी शाळेत निघाली होती. शौकत शेख याने मुलीला शाळेत सोडतो,असे सांगितले. त्यानंतर टेम्पोतून पुण्यातील शनिवारवाडा येथे घेऊन गेले. या वेळी अमोल इंगवलेही टेम्पोत होता. या प्रवासात आरोपींनी अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन करत विनयभंग केला. याप्रकरणी आरोपींवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहे.