मुंबई : लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यास पोलिसांना अखेर सात महिन्यांनी यश आले. या अल्पवयीन मुलीने इन्स्टाग्रामवर फोटो अपलोड करताच, पोलीस तिच्यापर्यंत पोहोचले आणि आरोपीला अटक केली.लग्नाचे आमिष दाखवून आदित्य नलावडे हा तरुण अल्पवयीन मुलीला मुंबईतून नांदेडला घेऊन गेला. ताे वाहनचालक म्हणून काम करताेे.अल्पवयीन मुलगी माटुंगा येथील एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. ती बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांनी याबाबत माटुंगा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली हाेती. त्यानुसार पोलीस तपास सुरू हाेता. मात्र, पाेलीस आपल्यापर्यंत पाेहाेचू नयेत यासाठी त्याने सोशल मीडिया अकाउंट आणि मोबाइल बंद केला हाेता. त्यामुळे त्यांच्यापर्यंत पाेहाेचणे अवघड झाले हाेते. दरम्यान, अल्पवयीन मुलीने तिचा फोटो सोशल मीडियावर अपलोड केल्याचे समजताच, पोलिसांनी हाच धागा पकड़ून मुलीसह आदित्यलाही नांदेडहून ताब्यात घेतले. आदित्यच्या पाेलीस चौकशीदरम्यान त्याने आपण पकडले जाऊ नये म्हणून जवळपास २४ मोबाइल क्रमांक वापरल्याचे समोर आले.
इन्स्टाग्रामवर फोटो टाकल्यामुळे सापडली अल्पवयीन मुलगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2020 01:43 IST