शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीची सामूहिक बलात्कारानंतर हत्या, घराजवळील शेतात फेकला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2021 16:01 IST

पोलिसांना घटनास्थळी 4 बिअरच्या बाटल्या आणि सिगारेटचे तुकडे सापडले आहेत, यावरुन आता तपासाचा वेग वाढवण्यात आला आहे.

पिलीभीत:उत्तर प्रदेशातील पिलीभीतमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पिलीभीतमध्ये 12वीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीची सामूहिक बलात्कारानंतर हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून, अटक केलेला तरुण मृत तरुणीचा प्रियकर असल्याचे बोलले जात आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत

नेमकं काय घडलं ?उत्तर प्रदेशातील पिलीभीतमध्ये 12वीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कारानंतर हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. 13 नोव्हेंबर रोजी मुलगी कॉलेजसाठी निघाली होती, पण ती संध्याकाळपर्यंत परत आलीच नाही. यानंतर तिचा शोध घेतला असता, एका उसाच्या शेतात तिचा मृतदेह आढळला. आरोपींनी शेतात नेऊन मुलीच्या तोंडात कपडा भरला आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तसेच, घटना लपवण्यासाठी बलात्कारानंतर मुलीची गळा आवळून हत्या केली. शनिवारी रात्री उशिरा मृतदेह घरापासून अवघ्या 500 मीटर अंतरावर असलेल्या शेतात आढळून आला. याप्रकरणी मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे.

दोनपेक्षा जास्त आरोपीमुलीच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमांच्या खुणा आढळून आल्या आहेत. तसेच, शरीराच्या आजूबाजूला रक्तही सांडलेले दिसत आहे. यावरुन तिच्यावर झालेल्या अत्याचाराची पातळी जाणवते. तर, मृतदेहापासून काही अंतरावर तिच्या वह्या, पिशवी, सायकल आणि बूट सापडले. याशिवाय पोलिसांना घटनास्थळी 4 बिअरच्या बाटल्या आणि सिगारेटचे तुकडे सापडले आहेत. आरोपींची संख्या दोनपेक्षा जास्त असल्याचा संशय आहे. 

वडिलांचा पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोपया घटनेनंतर मुलीच्या वडिलांनी पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. मुलीच्या वडिलांचे म्हणने आहे की, मुलगी शनिवारी सकाळी शाळेत जाण्यासाठी घरातून निघाली होती, मात्र बराच वेळ झाली तरी ती परत आली नाही. सायंकाळी घरच्यांनी पोलिसांत तक्रार केली, पण पोलिसांनी तात्काळ कारवाई केली नाही, असा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे.

मुलीच्या भावाला नग्रावस्थेत मृतदेह आढळलामुलगी घरातून बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबियांनी तिचा शोध सुरू केला. रात्री उशिरा 11 वाजण्याच्या सुमारास मुलीच्या भावाला बहिणीची सायकल शेतात दिसली. तो जवळ पोहोचला तेव्हा त्याला आपल्या बहिणीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत दिसला. यानंतर माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. एसपी दिनेश पी म्हणाले की, पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून सामूहिक बलात्कार, खून आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी चार पथके तयार करण्यात आली असून, लवकरच आरोपींचा शोध घेतला जाईल.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसPOCSO Actपॉक्सो कायदा