‘त्या’ अल्पवयीन मुलीने दिला जुळ्या मुलांना जन्म; फरार आरोपीचा शोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 02:54 IST2020-07-03T02:54:24+5:302020-07-03T02:54:51+5:30

पीडित मुलीला एका ओळखीच्या मुलाने लग्नाचे आमिष दाखवून गावाबाहेर बोलावले.

‘That’ minor girl gave birth to twins; Search for absconding accused continues | ‘त्या’ अल्पवयीन मुलीने दिला जुळ्या मुलांना जन्म; फरार आरोपीचा शोध सुरू

‘त्या’ अल्पवयीन मुलीने दिला जुळ्या मुलांना जन्म; फरार आरोपीचा शोध सुरू

मनोर : एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून अत्याचार करणाऱ्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.

पीडित मुलीला एका ओळखीच्या मुलाने लग्नाचे आमिष दाखवून गावाबाहेर बोलावले. बळजबरीने अनेकदा तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याने ती गर्भवती राहिली. या प्रकरणी तिच्या नातेवाईकांनी ११ जून २०२० ला पोलीस ठाण्यात त्या मुलाविरोधात तक्रार केली, तेव्हापासून तो फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. २९ जून रोजी त्या मुलीने ८ महिन्यातच जुळ्या मुलांना जन्म दिला. आरोपीविरोधात पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल असून अधिक तपास सुरू आहे.

Web Title: ‘That’ minor girl gave birth to twins; Search for absconding accused continues