डोंबिवलीत भाजपा पदाधिकाऱ्याकडून अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 20:25 IST2019-08-17T20:24:32+5:302019-08-17T20:25:10+5:30
नराधमाने पीडितेला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत अत्याचार केला.

डोंबिवलीत भाजपा पदाधिकाऱ्याकडून अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार
डोंबिवली : रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत एका मुलीवर मागील चार वर्षांपासून लैंगिक अत्याचार करणाऱ्या भाजपा पदाधिकाऱ्याला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे.
डोंबिवली पूर्वेत राहणाऱ्या या 19 वर्षीय विद्यार्थिनीला या 41 वर्षीय पदाधिकाऱ्याने त्याच्याशी मैत्री करण्यास सांगितले. मात्र, तिने नकार दिला होता. याचा राग आल्याने या नराधमाने पीडितेला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत जुलै 2015 ते ऑगस्ट 2019 या काळात वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला. संदीप माळी असे या पदाधिकाऱ्याचे नाव आहे.
याप्रकरणी पिडीत तरुणीने शनिवारी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत संदिपला अटक केली.