अल्पवयीन मुलाने धमकी देत केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 11:44 IST2021-07-22T11:44:15+5:302021-07-22T11:44:41+5:30

Crime News : जिवाचे बरेवाईट करून घेऊ असे म्हणत मुलीशी जानेवारी २०२१ ते ७ जुलै २०२१ दरम्यान शारीरिक संबंध प्रस्तापीत केले होते.

A minor boy threatened and abused a minor girl | अल्पवयीन मुलाने धमकी देत केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अल्पवयीन मुलाने धमकी देत केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार

लोकमत न्यूज नेटवर्क 
बुलडाणा: जीवाचे बरेवाईट करून घेईल अशी धमकी देत एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी  शहर पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडीत मुलगी व मुलगा हे दोघेही बुलडाणा शहरातीलच आहे. दरम्यान याप्रकरणी पोलिस सध्या अल्पवयीन मुलाचा शोध घेत आहे. यासंदर्भात पीडीत अल्पवयीन मुलीने बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात २१ जुलै रोजी तक्रार दिली आहे. त्या आधारावरहा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १७ वर्षी मुलाने १५ वर्षीय मुलीशी मधल्या काळात जवळीक साधली होती. सोबतच तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्तापीत करण्यासाठी प्रसंगी आपण आपल्याच जिवाचे बरेवाईट करून घेऊ असे म्हणत मुलीला त्याने ब्लॅकमेल करत तिच्याशी जानेवारी २०२१ ते ७ जुलै २०२१ दरम्यान शारीरिक संबंध प्रस्तापीत केले होते. प्रकरणी त्रस्त झालेल्या मुलीने या प्रकरणी पोलिस ठाण्यात २१ जुलै रोजी तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अल्पवयीन आरोपी मुलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

Web Title: A minor boy threatened and abused a minor girl