उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये घडलेल्या सौरभ हत्याकांडात दररोज नवीन माहिती समोर येत आहे. हत्या प्रकरणातील आरोपी आणि मृत सौरभची पत्नी मुस्कानबाबत आणखी धक्कादायक माहिती मिळाली आहे. मुस्कानला औषधं देणाऱ्या मेडिकल स्टोअरवर छापा टाकण्यात आला. ज्यामध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी उघड झाल्या आहेत.
अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासनाच्या पथकाने रविवारी उषा मेडिकल स्टोअरवर छापा टाकला. मुस्कानने ३३ रुपयांचे मेझोलम नावाचं नशेचं इंजेक्शन देखील खरेदी केलं होतं. मुस्कानने तिच्या मोबाईलमधील प्रिस्क्रिप्शन दाखवून हे खरेदी केल्याचं म्हटलं जात आहे. छाप्यादरम्यान मेडिकल स्टोअर ऑपरेटरला विचारण्यात आलं की सौरभला बेशुद्ध करणारं इंजेक्शन खरेदी करण्यासाठी कोण आलं होतं, हे इंजेक्शन डॉक्टरांनी लिहून दिलं होतं की ते असंच दिलं गेलं?
आता छापा टाकणारे पथक मेडिकल स्टोअरचा स्टॉक आणि बिलिंगचीही चौकशी करत आहे. मेडिकल स्टोअर ऑपरेटर म्हणतो की, मुस्कानच्या मनात हा कट सुरू आहे हे त्याला माहीत नव्हतं. आता चौकशीनंतर मेडिकल स्टोअरविरुद्ध गुन्हा दाखल करता येईल आणि कायदेशीर कारवाई करता येईल. कायदेशीर कारवाईनंतर, मेडिकल स्टोअरचा परवाना रद्द केला जाऊ शकतो. पोलिसांनी मेडिकल स्टोअर चालकाचीही चौकशी केली आहे. हे मेडिकल स्टोअर खैरनगरच्या मेडिसिन मार्केटमध्ये आहे.
मेडिकल स्टोअर ऑपरेटरने काय म्हटलं?
मेडिकल स्टोअर ऑपरेटरने सांगितलं की सुमारे दीड महिन्यांपूर्वी, एक महिला आणि एक वृद्ध पुरुष स्कूटरवरून हे औषध घेण्यासाठी आले होते. मुस्कानने तिच्या मोबाईलवर डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन दाखवून खरेदी केलं होतं. हे ३३ रुपये किमतीचे होतं आणि ते तिला देण्यात आलं. औषध विभागाच्या पथकाने साठा आणि बिलिंगची तपासणी केली आणि अँटी-डिप्रेसंटसह काही औषधांचे नमुने घेतले.
मुस्कानने सांगितलं की स्कूटर चालवणारी व्यक्ती माझे वडील आहेत, त्यांना समस्या होत आहे ज्यामुळे त्यांच्यासाठी हे इंजेक्शन आवश्यक आहे. दुकानदाराला मुस्कानचा हेतू समजला नाही आणि त्याने तिला इंजेक्शन दिले. ड्रग्ज इन्स्पेक्टरच्या मते, हे मेडिकल स्टोअर देखील संशयास्पद आहे. जर तपासात निष्काळजीपणा आढळला तर स्टोअरवर कायदेशीर कारवाई केली जाईल आणि गुन्हा दाखल केला जाईल आणि मेडिकल स्टोअरचा परवाना देखील रद्द केला जाईल.