एमडी ड्रग तस्करीप्रकरणी महिलेला बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 14:29 IST2019-04-17T14:26:49+5:302019-04-17T14:29:14+5:30
तिच्याकडून 1 लाख 6 हजार रुप्याचे एमडी ड्रग पोलिसांनी जप्त केले.

एमडी ड्रग तस्करीप्रकरणी महिलेला बेड्या
ठळक मुद्देबिल्किस ही ड्रग विक्री करते. तिच्या अटकेसाठी वांद्रे पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली.पळून गेलेल्या दोन मुलांचा वांद्रे पोलीस माग काढत आहेत.
मुंबई - एमडी ड्रग तस्करीप्रकरणी एका महिलेला वांद्रे पोलिसांनी अटक केली. बिल्किस फिरोज खान असं त्या महिलेचं नाव आहे. तिच्याकडून 1 लाख 6 हजार रुप्याचे एमडी ड्रग पोलिसांनी जप्त केले.
बिल्किस ही ड्रग विक्री करते. तिच्या अटकेसाठी वांद्रे पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली. वांद्रे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश अणावकर यांच्या पथकाने सोमवारी बिल्किसला ताब्यात घेतले. तिच्याकडून 53 ग्रॅम एमडी ड्रग पोलिसांनी जप्त केले. वांद्रे पोलिसांनी बिल्किसविरोधात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा दाखल केला. पळून गेलेल्या दोन मुलांचा वांद्रे पोलीस माग काढत आहेत.