एमबीबीएसच्या विद्यार्थीनीने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 21:08 IST2018-11-26T21:08:01+5:302018-11-26T21:08:25+5:30

तिच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांनी सांगितले.

MBBS Studentini jumped from the second floor | एमबीबीएसच्या विद्यार्थीनीने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली

एमबीबीएसच्या विद्यार्थीनीने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली

मुंबई - नायर रुग्णालयाच्या एका विद्यार्थीने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मदनपुरा परिसरात ही घटना घडली. जखमीअवस्थेत विद्यार्थिनीला जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या विद्यार्थीचे नाव इला रायकर असं असून ती एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती. तिच्या डोक्याला जबर मार लागला असून अदयाप ती बेशुद्ध अवस्थेत आहे. तिच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांनी सांगितले. तिने आत्महत्येचा प्रयत्न का केला याबाबत पोलीस तपास करत आहेत. 

Web Title: MBBS Studentini jumped from the second floor