शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

सवत घरी आणल्याने मुलांसोबत माऊलीने केली आत्महत्या? तीन मुलांना विष पाजून गळफासाचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 12:47 AM

Bhiwandi News : जेथे हे मृतदेह सापडले तेथे विषारी औषधाची पुडी व बाटली आढळली. त्यामुळे रंजना हिने स्वत: व मुलांना विष पाजून नंतर त्यांचे मृतदेह झाडाला टांगून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.

-  मेघनाथ विशेपडघा - भिवंडी तालुक्यातील उंबरखांड या जेमतेम साडेसहाशे लोकवस्तीच्या गावात वास्तव्य करीत असलेल्या श्रीपत बच्चू बांगारे याची पत्नी रंजनाचे ऑक्टोबर महिन्यात ऑपरेशन झाले होते. त्यावेळी घरातील लहान मुलांना सांभाळण्यासह घरकामाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्याकरिता रंजनाच्या मावशीची मुलगी सविता ही आली होती. याच काळात श्रीपत व सविता यांचे प्रेमसंबंध जुळले. श्रीपतने सविताशी लग्न केले. यामुळे निराश झालेल्या रंजनाने पाच्छापूर येथील तानसा अभयारण्याला लागून असलेल्या घनदाट जंगलातील डोंगरमाथ्यावर जाऊन स्वत: व मुले दर्शना (१२), रोहिणी (६), रोहित (९) यांच्यासह आत्महत्या केली, असे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे. रंजनाच्या भावाने श्रीपत व सविता यांच्यावर रंजनाचा छळ केल्याबद्दल गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. पोलिसांना घटनास्थळी विषाची पुडी सापडली आहे.रंजना व तिची तीन मुले २० ऑक्टोबर २०२० रोजी बेपत्ता झाली. याबाबत श्रीपतने पडघा पोलिसात तक्रार दिली होती. श्रीपतचा भाऊ संतोष हा जंगलात लाकडे तोडण्याकरिता गेला असता त्याला दुर्गंधी आल्याने तो त्या दिशेने गेला असता आप्प्याच्या झाडाला सडलेल्या अवस्थेतील दोन मृतदेह लटकले होते, तर दोन लहान मुलांचे मृतदेह जमिनीवर कोसळले होते. संतोषने ही वार्ता गावात देताच श्रीपत व सविता यांनी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.पोलीस, घटनास्थळी उपस्थित ग्रामस्थ व रंजनाचे नातलग यांनी दिलेल्या माहितीनुसार, रंजनाचे ऑपरेशन झाल्याने घरातील कामे करण्याकरिता सविता आली होती. त्यावेळी श्रीपत व सविता यांचे प्रेमसंबंध जुळले. त्यांनी लग्न केले. या दोघांचे लग्न झाल्यानंतर जेमतेम तीन दिवसांनंतर रंजना ही मुलांसोबत निघून गेली. गेल्या दोन महिन्यांत तिचा ठावठिकाणा शोधण्यात पोलिसांना यश आले नाही. शुक्रवारी अचानक रंजना व तिच्या मुलांचे सडलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडले. जेथे हे मृतदेह सापडले तेथे विषारी औषधाची पुडी व बाटली आढळली. त्यामुळे रंजना हिने स्वत: व मुलांना विष पाजून नंतर त्यांचे मृतदेह झाडाला टांगून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.रंजना आणि तिची तीन मुले २० ऑक्टोबर रोजी बेपत्ता झाली. याबाबत श्रीपतने पडघा पोलिसात तक्रार दिली होती. पोलिसांना घटनास्थळी विषाची पुडी सापडली आहे.श्रीपत व सविता हे सध्या मुंबईतील जे.जे. इस्पितळात उपचार घेत असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. त्यांच्या चौकशीतून अधिक माहिती उघड होईल. ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणे