शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

खळबळजनक! मटका, दारूबंदीसाठी आठ तासांपासून तरूण टॉवरवर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 8:34 PM

Crime News : लातूर तालुक्यातील बल्लाळनाथ चिंचोली येथील घटना

ठळक मुद्दे सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास लातूरहून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे.नवनाथ जदले यांची समजूत काढण्याचा अनेकांनी प्रयत्न केला मात्र ते खाली उतरण्याच्या तयारीत नसल्याचे सांगण्यात आले.

बल्लाळनाथ शिंदे

चिंचोली ब. (जि. लातूर) : गावात सुरू असलेली अवैध दारू, मटका बंद करावा, या मागणीसाठी लातूर तालुक्यातील चिंचोली-बल्लाळनाथ येथील नवनाथ हरिभाऊ जलदे (वय ४६) हे सोमवारी दुपारी १२.३० वाजण्याच्यासुमारास टॉवरवर चढले आहेत. तब्बल तेरा तास उलटले. मध्यरात्रीचे १.३० वाजले तरी ते खाली आले नाहीत.  अनेकांनी विनवणी केली. तहसीलदार स्वप्नील पवार, गटविकास अधिकारी शाम गोडभरले यांनी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने  ते दोघेही निघून गेले. 

पोलीस व महसूल विभागाकडून त्याची समजूत काढण्यात येऊनही तो खाली येत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. सायंकाळी लातूरहून अग्निशामन दलाचे पथकही घटनास्थळी पोहंचले होते. चिंचोली-बल्लाळनाथ येथे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. दारू, गुटखा, मटका बंद करण्यात यावा, यासाठी तरुणाने अचानक टॉवरवर चढून आंदोलन सुरू केल्याने प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली आहे. दुपारपासून अनेकजण त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करीत असून, रात्री १ वाजेपर्यंत तरुण खाली उतरला नव्हता.  घटनास्थळी नायब तहसीलदार राजेश जाधव,  श्रावण उगले,  सपोनि. ए. बी. घारगे, बीट अंमलदार एस. एन. जाधव, तलाठी जी. आर. मुळे हे उशिरापर्यंत बसून हाेते.  यावेळी  उपसरपंच विश्वास कावळे, अनिल पाटील, मधुकर जोगदंड, पोलीस पाटील अजित माळी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजकुमार सुरवसे यांच्यासह ग्रामस्थांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.  ग्रामविकास अधिकारी व्ही.एस. हणमंते हे रात्री उशिरापर्यंत बसून होते. रात्री १२ वाजण्याच्या सुमारास सर्वजण निघून गेले तरीही नवनाथ खाली उतरले नाहीत. दरम्यान, जोपर्यंत टॉवरला संरक्षण भिंत बांधण्यात येणार नाही, तोपर्यंत हे टॉवर चालू करू नये, अशा सूचना महसूल प्रशासनाने दिल्या असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 

आंदोलन म्हणावे की स्टंट काहीच कळेनाअचानक टॉवरवर चढून आंदोलन सुरू केलेल्या तरुणास खाली उतरविण्यासाठी पोलिसांसह महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. तसेच जलदे यांच्या कुटुंबातील काही सदस्यांनीही त्यांना खाली येण्यासाठी विनंती केली; मात्र कोणाचे ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी गावातील नागरिकांसह बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. अचानक केलेला हा प्रकार आंदोलन की स्टंट हे कोणाच्याच लक्षात येईना. 

तहसीलदार, बीडीओंनी भेट देऊन केली विनवणीटॉवरची उंची जवळपास २५० फुट इतकी आहे. याठिकाणी संरक्षक भिंत नसल्याने कोणीही येते. सोमवारी दुपारी १२.३० वाजेपासून टॉवरवर चढून बसलेल्या तरूणाची मागणी नेमकी काय, हे प्रशासनालाही कळेना. अवैध दारू विक्री, मटका आदी मागण्या असल्याचे सांगण्यात येत असले तरी त्यांनी एकदाही कुणाकडे तक्रार केली नाही. अचानक करण्यात आलेला हा प्रकार आंदोलन समजावा की अन्य काही असा प्रश्न सर्वांनाच पडला. रात्री १० वाजण्याच्या सुमारास तहसीलदार स्वप्नील पवार, गटविकास अधिकारी शाम गोडभरले यांनी भेट देऊन समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र नवनाथ जलदे यांनी त्यांचेही ऐकले नाही. रात्री १ वाजेपर्यंतही ते टॉवरवरच बसून होते.

टॅग्स :laturलातूरFire Brigadeअग्निशमन दलliquor banदारूबंदीPoliceपोलिस