शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

PUBG वर जुळलं प्रेम, एका प्रेयसीवरून दोन प्रियकरांमध्ये झाला राडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2022 21:35 IST

Love flourished on pubg : येथे राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून प्रेयसीला भेटायला उत्तराखंडला आलेल्या दोन तरुणांमध्ये राडा झाला.

फेसबुक, ईमेल आणि व्हाट्सअॅपवर मैत्री आणि प्रेम झाल्याचं तुम्ही खूपदा ऐकलं असेल. अशीच एक घटना उत्तराखंडमधील हल्द्वानी भागात घडली आहे. येथे राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून प्रेयसीला भेटायला उत्तराखंडला आलेल्या दोन तरुणांमध्ये राडा झाला.

दोन्ही तरुणांसोबत एकच तरुणी प्रेमाचा खेळ खेळत होती. तब्बल दोन वर्षांपूर्वी ऑनलाईन गेम खेळत असताना तिची मैत्री राजस्थानमधील तरुणासोबत झाली होती. त्यानंतर दोघेही एकत्रच पबजी गेम खेळू लागले. नंतर दोघांनी आपला मोबाईल नंबर शेअर केला आणि फोनवर बोलू लागले. यादरम्यान दोघेही प्रेमात पडले आणि नंतर भेटायचं ठरलं.

दरम्यान एक महिन्यापूर्वी ऑनलाईन खेळादरम्यान तरुणीचा मैत्री मुरादाबाद येथील एका तरुणासोबत झाली. या तरुणाच्याही ती प्रेमात पडली. तरुणीने मुरादाबादमधील तरुणाला भेटण्यासाठी हल्द्वानी येथे बोलावलं. शुक्रवारी दोघांना भेटायला तरुणी मल्ला गोरखपूर हल्द्वानी येथे पोहोचली. येथे पोहोचताच दोघेही तरुणीला आपली प्रेयसी असल्याचं सांगून आपापसात भांडू लागले. गोंधळ झाल्यानंतर कोणीतरी पोलिसांना याबाबत कळवले. पोलीस दोघांनाही ठाण्यात घेऊन गेले. येथे चौकशीदरम्यान सत्य उघडकीस आलं.

तरुणीने दोन्ही तरुणांना एकत्र का बोलावलं, याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. ज्यावेळी दोन्ही तरुण भांडण करीत होते. त्यावेळी तरुणीही तेथे होती. त्यावेळी तिने राजस्थानमधील तरुणाला कानशिलात लगावली. तर महत्वाचे म्हणजे पबजी गेम खेळण्यात दोन्ही तरुण प्रोफेशनल लेव्हलचे खेळाडू आहेत. दोघांचा खेळ पाहून तरुणीही त्यांच्याकडे आकर्षित झाली. त्या दोघांशी खेळ खेळण्याशिवाय ती प्रेमाने बोलू लागली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPUBG Gameपबजी गेमUttarakhandउत्तराखंडRajasthanराजस्थानUttar Pradeshउत्तर प्रदेश