दरोड्याचे प्रत्यक्षदर्शी संपविण्यासाठी हत्याकांड; अखेर 3 सराईत दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 10:25 PM2021-04-06T22:25:40+5:302021-04-06T22:27:44+5:30

Dacoity : या तीघांनी मिळून वाखारी येथील समाधान अण्णा चव्हाण यांच्या घरावर हल्ला करत त्यांच्यासह पत्नी भारती, मुलगी आराध्या आणि मुलगा अनिरुध्द यांच्या मानेवर, डोक्यावर व हातांवर कुऱ्हाडीसारख्या शस्त्राने वार करत ठार मारल्याची कबुली दिली.

Massacre to end eyewitness to robbery; Eventually 3 innkeepers were handcuffed | दरोड्याचे प्रत्यक्षदर्शी संपविण्यासाठी हत्याकांड; अखेर 3 सराईत दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या

दरोड्याचे प्रत्यक्षदर्शी संपविण्यासाठी हत्याकांड; अखेर 3 सराईत दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या

Next

नाशिक : नांदगाव तालुक्यातील वाखारी-जेऊर रस्त्यावरील मौजे वाखारी शिवारातील एका शेतातील घरावर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांनी एक पुरुष, महिला व दोन चिमुकल्यांना कुऱ्हाडीने निघृणपणे अत्यंत क्रूरतेने ठार मारल्याची घटना घडली हाेती. या हत्याकांडाने अवघा जिल्हा हादरला होता. पोलिसांनी सातत्याने गुन्ह्याचा तपास करत संशयित दरोडेखोरांचा शोध घेऊन त्यांना बेड्या ठोकल्या आहे.

दरोडे टाकून मौल्यवान वस्तु दागिने चोरी करुन आपली गुजराण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांची टोळी नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर या तीन जिल्ह्यांत प्रामुख्याने सक्रीय होती. गेल्या वर्षी ऑगस्य महिन्याच्या पहिल्या आठवड्यात याच टोळीतील काही दरोडेखोरांनी वाखारी येथील शेतातील एकाकी घर बघून तेथे दरोडा टाकला होता. यावेळी हल्लेखोरांना बाहेर ओट्यावर झोपलेल्या कुटुंबातील काही सदस्यांनी बघितले असता त्यांनी दरोड्याचे प्रत्यक्षदर्शींना संपविण्याच्या इराद्याने कुऱ्हाडीसारख्या शस्त्राने निघृणपणे चौघांची हत्या केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीवरुन सर्वप्रथम महामार्गावरील ओझरजवळील दहावा मैल परिसरात सापळा रचला. तेथे संशयित संकेत उर्फ संदीप महेंद्र चव्हाण (रा.भुषणनगर, केडगाव, जि.अहमदनगर) यास पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना शिताफीने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याची पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने त्याच्या दोन साथीदारांच्या मदतीने काहीही कमधंदा करण्याची सवय नसल्याने व चैनीसाठी पैशांची आवश्यकता असल्याने रात्रीच्यावेळी एकाकी भागातील घरांवर दरोडा टाकून लूट करण्याचा मार्ग अवलंबविला होता, अशी कबुली दिली. पोलिसांनी त्याने दिलेल्या माहितीवरुन गुन्ह्याचा पारंपरिक व तांत्रिक पध्दतीने तपास करत त्याचे दोन साथीदार सचिन ऊर्फ बोंग्या उर्फ पवन, उर्फ रवी उर्फ धर्मा सखाहरी चव्हाण, रा.पढेगाव, ता.कोपरगाव, जि.अहमदनगर) आणि सचिन विरुपण भोसले (रा.शिरोडी, ता.वाळुंज, जि.औरंगाबाद) यांनाही अटक केली. या तीघांनी मिळून वाखारी येथील समाधान अण्णा चव्हाण यांच्या घरावर हल्ला करत त्यांच्यासह पत्नी भारती, मुलगी आराध्या आणि मुलगा अनिरुध्द यांच्या मानेवर, डोक्यावर व हातांवर कुऱ्हाडीसारख्या शस्त्राने वार करत ठार मारल्याची कबुली दिली.  तीनही दरोडेखोर हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापुर्वीही नाशकातील नांदगाव, येवला औरंगाबादमधील वैजापुर, गंगापुर आणि अहमदनगरमधील कोपरगाव, नगर तालुका पोलीस ठाण्यांत दरोडा, जबरी चोरी, घरफोडीसह शरिराविरुध्दचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले.

Web Title: Massacre to end eyewitness to robbery; Eventually 3 innkeepers were handcuffed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.