आई, माफ कर! महिला पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या; आरशावरील मजकूर पाहून सारेच हेलावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2022 15:20 IST2022-03-18T15:16:59+5:302022-03-18T15:20:10+5:30
पोलीस उपनिरीक्षक महिलेची आत्महत्या; आरशावर मेसेज लिहून व्यक्त केली शेवटची इच्छा

आई, माफ कर! महिला पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या; आरशावरील मजकूर पाहून सारेच हेलावले
कौटुंबिक वादांना कंटाळून पंजाबमध्ये एका महिला पोलीस उपनिरिक्षकानं आत्महत्या केली आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील रहिम यार खानमध्ये ही घटना घडली आहे. आत्महत्या करण्याआधी महिला पोलीस अधिकाऱ्यानं अखेरची इच्छा एका आरशावर लिहिली.
पोलीस उपनिरीक्षक मेरी रोझ यांनी कौटुंबिक वादांना कंटाळून टोकाचं पाऊल उचललं. मेरी यांनी दोन मुली आहेत. आत्महत्या करण्याआधी त्यांनी आरशावर आईसाठी एक मेसेज लिहिला. माझ्या आत्म्याला शांती लाभो यासाठी प्रार्थना कर. जबाबदारी घेऊ शकेल अशा व्यक्तींसोबत माझ्या मुलींचा विवाह करून दे, असं मेरी यांनी आरशावर लिहिलं.
दक्षिण पंजाबमधील रहिम यार खान शहरात कार्यरत होत्या. 'रोझ कार्यक्षम पोलीस अधिकाऱ्यांपैकी एक होत्या. प्रत्येक गुन्ह्याचा तपास करताना त्या अतिरिक्त मेहनत घ्यायच्या. स्वत: काम करून त्या इतरांसमोर आदर्श ठेवायच्या,' अशा शब्दांत एसएसपी तपास प्रमुख मोहम्मद दोस्त यांनी रोझ यांच्या आठवणींना उजाळा दिला.
सुट्ट्या नाकारण्यात आल्यानं मेरी रोझ यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचा दावा दोस्त यांनी फेटाळून लावला. रोझ कोणत्या मानसिक समस्यांमधून जात होत्या त्याची आम्हाला कल्पना नव्हती. अन्यथा पोलीस दलानं त्यांच्या मदतीसाठी काहीतरी पावलं नक्कीच उचलली असती, असं दोस्त म्हणाले.
आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या संदेशात मेरी यांनी कौटुंबिक कारणांचा स्पष्ट उल्लेख केला आहे. आत्महत्या प्रकरणाच्या तपासातील हा महत्त्वाचा पुरावा आहे. लाहोरमध्ये वास्तव्यास असलेल्या रोझच्या पतीचीही चौकशी करण्यात येईल. रोझ आणि तिच्या पतीमध्ये सारं काही आलबेल नव्हतं, हे तिच्या शेवटच्या मेसेजमधून स्पष्ट झालं आहे, असं दोस्त यांनी सांगितलं.