शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिरुर तालुक्यात कौटुंबिक छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2018 18:16 IST

माहेराहुन पैसे आणण्यासाठी विवाहितेचा तिच्या सासरच्या घरातील लोक नेहमी मारहाण करुन शारीरिक व मानसिक छळ करत होते.

ठळक मुद्देयाप्रकरणी चार संशयित आरोपींना अटक

रांजणगाव सांडस : शिरसगाव काटा ता. शिरुर येथील विवाहितेने पैशांसाठी सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून महिलेने शेतातील आंब्यांच्या झाडाला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.ही घटना शुक्रवारी (दि. १६) घडली. मयत महिलेच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार, या प्रकरणी चार संशयित आरोपींना पोलिसांनीअटक केली आहे.  मंगल राजाराम शिंदे (वय ३१)असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.या घटनेतील संशयित आरोपी राजाराम तुळशीराम शिंदे(पती),मच्छिंद्र तुळशीराम शिंदे(दिर),सुमन तुळशीराम शिंदे (जाव),महेंद्र मच्छिंद्र शिंदे(पुतण्या) अशी याप्रकरणी पोलिसांनीअटक केलेल्या आरोपींची नावे आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतातील पिंकाना पाणी देत असताना आपणांस भावजय मंगल शिंदे यांचा मृतदेह शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. मयत विवाहितेला माहेराहुन पैसे आणण्यासाठी तिच्या सासरच्या घरातील लोक नेहमी मारहाण करुन शारीरिक व मानसिक छळ करत होते. काही दिवसांपासून माहेरहून एक लाख रुपये घेऊन ये, म्हणून मयत महिलेचा नवरा,दीर,जाव व पुतण्या जाच करत होते,अशी तक्रार मयत मंगल शिंदेचा भाऊ दिपक दत्ताञय साळूंके यांनी पोलिसांकडे दिली आहे.या घटनेतील मयत महिलेचे शवविच्छेदन न्हावरे येथे राञी दीड वाजता झाले,परंतु जोपर्यंत संशयित आरोपिंना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह हलवणार नाही अशी भुमिका मयत महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांनी घेतल्याने मयत महिलेचा मृतदेह दुसऱ्यादिवशी दुपारी १२ वाजेपर्यत ग्रामीण रुग्णालयातच होता. पोलिसांनी याप्रकरणात मध्यस्थी केल्यावर नातलगांनी महिलेचा मृतदेह शिरसगाव येथे अंत्यसंस्कारासाठी नेला. करण्यात आले.या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे करीत आहेत.

टॅग्स :ShirurशिरुरPoliceपोलिसArrestअटकDeathमृत्यू