विवाहित तरुणीची गोळी झाडून हत्या; कार्ला येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2022 23:32 IST2022-09-18T23:31:39+5:302022-09-18T23:32:14+5:30

मयत तरुणीवर कोणी व का गोळी झाडली, हे नेमके आत्ताच सांगता येणार नसल्याचे नळदुर्ग पोलिसांनी सांगितले.

Married woman shot dead; Incident at Karla, Usmanabad crime news | विवाहित तरुणीची गोळी झाडून हत्या; कार्ला येथील घटना

विवाहित तरुणीची गोळी झाडून हत्या; कार्ला येथील घटना

उस्मानाबाद : तुळजापूर तालुक्यातील कार्ला येथील एका वीस वर्षीय विवाहित तरुणीची गोळी झाडून हत्या झाल्याचा प्रकार रविवारी सायंकाळी घडला आहे. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना रात्री ८ वाजेच्या सुमारास तिचा मृत्यू झाला.

कार्ला येथील काजल मनोज शिंदे (२०) हिचा काही वर्षांपूर्वीच विवाह झाला होता. मात्र, सध्या ती पतीसह कार्ला येथील आपल्या आई-वडिलांकडे वास्तव्यास होती. दरम्यान, रविवारी सायंकाळी तिच्यावर गोळीबार करण्यात आला. बंदुकीची एक गोळी छातीवर लागल्याने ती गंभीर जखमी झाली. या अवस्थेतच तिला कुटुंबियांनी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने काजलवर प्रथमोपचार करून तातडीने पुढील उपचारासाठी उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे तिच्यावर उपचार सुरू करताच ८ वाजण्याच्या सुमारास तडफडून मृत्यू झाला.

दरम्यान, ही घटना नळदुर्ग ठाण्याच्या हद्दीत झाली असल्याने रात्री माहिती कळल्यानंतर १० वाजेच्या सुमारास पोलीस घटनास्थळी रवाना झाले. मयत तरुणीवर कोणी व का गोळी झाडली, हे नेमके आत्ताच सांगता येणार नसल्याचे नळदुर्ग पोलिसांनी सांगितले.

कार्ला येथील २० वर्षीय तरुणीस गंभीर जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात रविवारी रात्री दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला आहे. एक्सरे रिपोर्ट व शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूची अधिक माहिती कळू शकेल.
- डॉ.सुशील चव्हाण, निवासी वैद्यकीय अधिकारी, जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद

Web Title: Married woman shot dead; Incident at Karla, Usmanabad crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.