शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

PUBG खेळताना विवाहित महिलेचा तरुणावर जीव जडला; पतीला दिली ५५ तुकडे करण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 19:56 IST

त्रासलेल्या पतीने जीवाच्या सुरक्षिततेसाठी पत्नीला तिच्या प्रियकरासोबत पाठवले.

UP Crime: उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑनलाइन गेम PUBG ने एका कुटुंबाला उद्ध्वस्त केले. ही घटना सिटी कोतवाली परिसरातील भाटीपुराची आहे. येथे राहणारा 30 वर्षीय शीलू रायकवार मिठाई बनवण्याचे काम करतो. शीलूचा विवाह 2022 मध्ये बांदा जिल्ह्यातील आराधनाशी झाला होता. लग्नानंतर काही काळातच आराधनाला PUBG चे व्यसन लागले अन् गेम खेळता-खेळता तिची लुधियानातील शिवम नावाच्या तरुणाशी ओळख झाली.

विवाहित महिलेचे जडले प्रेमशीलूने सांगितले की, तो दिवसभर दुकानात राहायचा, तर त्याची पत्नी घरी PUBG खेळायची. हळूहळू ती तिच्या पतीपासून दूर राहू लागली. तिने पतीसोबत भांडण सुरू केले. अनेकदा मुलाला मारुन खोटे आरोप करण्याचा प्रयत्न केला. निष्पाप दीड वर्षीय मुलाच्या शरीरावर अजूनही जखमांच्या खुणा आहेत. त्याने पत्नीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आराधनाने त्याला जीवे मारण्याची आणि ५५ तुकडे करुन ड्रममध्ये भरण्याची धमकी दिली.

यानंतर महिलेचा प्रियकर शिवम अचानक ९०० किमी अंतरावरुन तिच्या घरी पोहोचला, ज्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. आराधनाने तिच्या प्रियकरासोबत जाण्याचा आग्रह धरला. यानंतर शीलूने याबाबत पोलिसांकडे तक्रार केली. शांतता भंग केल्याबद्दल पोलिसांनी शिवमला समज दिली. आराधनाने मात्र शेवटपर्यंत तिच्या नवऱ्याला सोडून शिवमसोबत जाण्याचा निर्णय घेतला. अखेर त्रासलेल्या पतीने स्वतःच्या आणि मुलाच्या जीवाच्या सुरक्षिततेसाठी पत्नीला तिच्या प्रियकरासोबत पाठवले. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टhusband and wifeपती- जोडीदारPoliceपोलिस