खळबळजनक! लग्नापूर्वी दोन कुटुंबात झाली, हाणामारीत एकाच मृत्यू तर 5 जणांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 04:09 PM2020-10-12T16:09:59+5:302020-10-12T16:10:44+5:30

Assaulting : आठ फरार, आराेपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी    

Before marriage took place querrel in two families, one dead and five arrested | खळबळजनक! लग्नापूर्वी दोन कुटुंबात झाली, हाणामारीत एकाच मृत्यू तर 5 जणांना अटक 

खळबळजनक! लग्नापूर्वी दोन कुटुंबात झाली, हाणामारीत एकाच मृत्यू तर 5 जणांना अटक 

Next
ठळक मुद्देपोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी दोन्ही पक्षाच्या लोकांना पोलीस ठाण्यात नेले. तिथे कार्यवाही सुरु  असताना नवऱ्याचा भाऊ विठू जनार्दन तुपट (33) याला त्रास जाणवू लागला.

निखील म्हात्रे

अलिबाग : तालुक्यातील पेझारी येथे झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (11 ऑक्टोबर) रोजी घडली. याप्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली असून आणखी आठ जणांचा शोध सुरु  आहे. लग्नापूर्वीच दोन कुटुंबात वाद झाला. वादाचे पर्यावसान हाणामारीत होऊन यामध्ये नवऱ्याच्या मोठ्या भावाला जीव गमवावा लागला.आज या अटकेतील पाच जणांना अलिबाग येथील न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  


पेझारी येथील एका मुलीचे लग्न बदलापूर येथील मुलासोबत ठरले होते. या दोघांचा साखरपुडा झाला होता. मात्र साखरपुड्याच्या कार्यक्र मात मुलीकडील फोटोग्राफरने मुलाच्या लहान बिहणीचा नंबर मागितला. तसेच ओळख वाढविण्याचा प्रयत्न केला. मात्र ही बाब मुलाच्या घरच्यांना आवडली नाही. यावरु न दोन कुटुंबात वाद सुरु  झाले. मुलाच्या घरच्यांनी त्या फोटोग्राफरला माफी मागायला सांगा, असे मुलीकडच्या मंडळींना सांगितले. तसेच माफी मागितली नाही तर लग्न करणार नाही, असेही कळवले. मात्र याकरिता मुलीच्या घरचे तयार नव्हते. या विषयावरु न रविवारी पेझारी येथील साई वाटीका हॉटेलजवळ दोन्ही कुटुंबांनी बैठक बोलावली.  वाद चिघळत जाऊ  नये म्हणून प्रत्यक्ष भेटून विषय संपवून टाकू, असे सांगितले. त्यानुसार नवरा मुलगा, त्याचे तीन भाऊ आणि गाडी चालक असे पाच जण रविवारी पेझारीला आले. पेझारी येथील साई वाटीका हॉटेलजवळ दोन्ही पक्षाच्या लोकांमध्ये बोलणी सुरु  झाली. आवाज वाढू लागले. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हॉटेलबाहेर जोरदार बाचाबाची सुरु  झाली. ते पाच आणि हे दहा ते बारा जण. त्यांनी नवरा मुलगा आणि त्याच्या भावाला मारहाण करण्यास सुरु वात केली. पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी
पोहचले. त्यांनी दोन्ही पक्षाच्या लोकांना पोलीस ठाण्यात नेले. तिथे कार्यवाही सुरु  असताना नवऱ्याचा भाऊ विठू जनार्दन तुपट (33) याला त्रास जाणवू लागला. पोलिसांनी त्यांना मेडीकल करण्यास सांगितले. त्यानुसार तुपट आणि अन्य पोयनाड येथील आरोग्य केंद्रात गेले. मात्र त्यांच्याकडे पोलिसांचे पत्र नसल्याने त्यांना दाखल करु न घेतले नाही. त्यामुळे अलिबाग जिल्हा रु ग्णालयात दाखल होण्यास सांगितले. रु ग्णालयात उपचार सुरु
असतानाच विठू तुपट याचा मृत्यू झाला. विठू याच्यामागे दोन लहान मुली आहेत. एका किरकोळ वादातून एक जीव तर गेलाच; परंतु दोन लहानग्यांचे वडील ही गमावले आहेत. दरम्यान, याप्रकरणी पोयनाड पोलिसांनी हत्येसह मारहाण प्रकरणी गुन्हे दाखल केले असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तर फरार असलेल्या आठ जणांचा शोध सुरु असल्याची माहिती तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड यांनी
दिली. अधिक तपास सुरु आहे.

Web Title: Before marriage took place querrel in two families, one dead and five arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.