शहरं
Join us  
Trending Stories
1
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
2
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
3
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
4
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
5
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
6
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
7
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
8
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
9
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
10
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
11
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
12
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
13
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
14
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
15
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
16
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
17
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
18
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
19
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
20
भाजपा-शिंदे गटात वाद, चंद्रशेखर बावनकुळे थेट बोलले; म्हणाले, “कारवाई करू, आमचे संस्कार...”
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाआधी एकमेकांची हरप्रकारे हेरगिरी केली; समजल्यावर प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 20:38 IST

त्यांनी दीड वर्षापूर्वी लग्न केले होते. 

ठळक मुद्देघटस्फोट घेण्याचे मुख्य कारण म्हणजे लग्नाआधीची ओळख बदलणे आणि एकमेकांवर हेरगिरी करणे. पहिल्या भेटीत या दोघांनीही हे संबंध सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला, पण एकमेकांबद्दलही शंका निर्माण झाली.

भोपाळ - भोपाळ येथील फॅमिली कोर्टात एक अनोखा प्रकरण समोर आला आहे. यात लग्नाआधी केलेली हेरगिरी व बोललेले खोटं उघड झाले, मग प्रकरण घटस्फोटापर्यंत पोचले. कोर्टात असे आढळले आले की, लग्नाआधी मुलाने सहा सिम बदलून एकमेकांची हेरगिरी केली आणि मुलीने सोशल मीडियावर चार बनावट आयडी बनवल्या. अशा प्रकारे जासूसीनंतर त्यांचे लग्न झाले, परंतु जेव्हा त्यांचे हे प्रताप एकमेकांसमोर आले. तेव्हा त्यांनी परस्पर संमतीने घटस्फोटाचा खटला दाखल केला.घटस्फोट घेण्याचे मुख्य कारण म्हणजे लग्नाआधीची ओळख बदलणे आणि एकमेकांवर हेरगिरी करणे. मिळालेल्या माहितीनुसार, २८ वर्षाची पत्नी भोपाळमधील शॉपिंग मॉलमध्ये कार्यरत आहे. नवरा सॉफ्टवेअर अभियंता आहे. दोघांची चार वर्षांपूर्वी सोशल मीडियावरून भेट झाली. दोघांनी सोशल मीडियावर सहा महिन्यांपर्यंत गप्पा मारल्या, त्यानंतर त्यांची भेट झाली. पहिल्या भेटीत या दोघांनीही हे संबंध सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला, पण एकमेकांबद्दलही शंका निर्माण झाली. त्यामुळे सोशल मीडियावर स्वतंत्र सिम आणि अकाउंट्सद्वारे पती-पत्नीने एकमेकांची परीक्षा घेण्यात कसलीही कसर मागे सोडली नाही.मुलाला नेहमी वाटायचे की शॉपिंग मॉलमध्ये काम करणारी मुलगी नेहमी नटून तयार असते, तिला मुलं प्रपोज करत असावीत आणि कदाचित तिने प्रपोजल मान्य केले असेल. याची पडताळणी करण्यासाठी त्याने अडीच वर्षाच्या प्रेमसंबंधादरम्यान सहा वेगवेगळ्या सिम्सद्वारे त्या मुलीकडे संपर्क साधला आणि तिची उलटतपासणी घेतली. त्याचप्रमाणे मुलीला भीती वाटत होती की, मुलाने ज्या प्रकारे सोशल मीडियावर तिला न पाहता प्रेम केले, त्याने इतर मुलींबरोबर असेच केले असावे. हे तपासण्यासाठी त्या मुलीने देखील चार वेळा फेक आयडीही बनवून त्या मुलाशी गप्पा मारल्या आणि त्याची हेरगिरी केली. जेव्हा त्यांना वाटले सर्व काही ठीक आहे, तेव्हा त्यांनी दीड वर्षापूर्वी लग्न केले होते. 

लग्नानंतर पती - पत्नीच्या खोट्या नात्याचे सत्य उघडकीस आले तेव्हा या गुपितातून पडदा उठला. वास्तविक, मुलगी लग्नाच्या वेळी म्हणाली होती की, तिला आई-वडील नाहीत आणि मामा - मामी हेच सर्व काही तिच्यासाठी आहे. लग्नानंतर पतीचा पत्नीच्या मेक अपवरून वाद निर्माण झाला आणि तो वाढला. जेव्हा स्पष्टीकरणासाठी पतीने आपल्या मामाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ते अस्तित्त्वात नाही हे सिद्ध झाले. यानंतर, पटीने त्याचे सहा सिम्स बदलून केलेल्या हेरगिरीचे सत्य सांगितले. यावर पत्नीने बनावट आयडी बनवून केलेल्या हेरगिरीच्या कबुलीही दिली.

टॅग्स :Divorceघटस्फोटFamilyपरिवारCourtन्यायालयmarriageलग्न