दहा लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ; सात जणांवर गुन्हा नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 11:45 IST2021-06-23T11:40:55+5:302021-06-23T11:45:02+5:30

तक्रारीवरून वसमत शहर पोलिसांनी सासरच्या सात जणांविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

Marital harassment for ten lakh rupees; Crime recorded against seven persons pdc | दहा लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ; सात जणांवर गुन्हा नोंद

दहा लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ; सात जणांवर गुन्हा नोंद

वसमत (जि. हिंगोली) : नवीन कार घेण्यासाठी माहेराहून दहा लाख रुपये घेऊन ये, या मागणीसाठी विवाहितेला मारहाण करून छळ केल्याची तक्रार विवाहितेने दिली आहे. या तक्रारीवरून वसमत शहर पोलिसांनी सासरच्या सात जणांविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

बसवेश्वरनगर भागातील कोमल अविनाश स्वामी (२६) या विवाहितेने तक्रारीवरून अविनाश सतीश स्वामी, सतीश भाऊराव स्वामी, जयश्री सतीश स्वामी, अश्विनी सतीश स्वामी (सर्व रा. बदलापूर जि. ठाणे), सुरेखा मनोज स्वामी सुरेश बाबूराव स्वामी अंजली स्वामी यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला. 

Web Title: Marital harassment for ten lakh rupees; Crime recorded against seven persons pdc