शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

Mansukh Hiren Case: ठाकरे सरकारला केंद्राचा दणका; मनसुख हिरेन प्रकरणाचा तपासही एनआयएकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2021 14:23 IST

Mansukh Hiren death case transfered to NIA : एनआयएला खुनाची केस थेट हाती घेण्याचा अधिकार नाही. पण मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा संबंध अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या कारशी आहे. अंबानींच्या घराबाहेर आढळलेली कार हिरेन यांच्याच मालकीची होती. त्यामुळेच हिरेन यांच्या मृत्यूचा तपास करण्याची विनंती करण्यात आली होती.

भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली कार ठेवल्याप्रकरणीचा तपास मुंबई पोलिसांकडून काढून घेत एनआयएकडे (NIA) सोपविलेला असताना आता आणखी एक मोठा धक्का केंद्रीय गृहमंत्रालयाने दिला आहे. आता स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरेन प्रकरणाचा (Mansukh Hiren Case) तपासही एनआयए करणार आहे. (Mansukh Hiren death case taken over by NIA. Formal order from MHA issued to NIA regarding this. This case was earlier being investigated by Maharashtra ATS: Official Sources)

Sachin Vaze: सचिन वाझेंचे आयुष्यच रहस्यमय! स्वत:चे मेसेंजिंग अ‍ॅप, मराठी फेसबुक ते रितेश-जेनेलियावर खटला...

स्फोटक प्रकरणाचा तपास याआधी मुंबई पोलीस दलाच्या सीआययूचे प्रमुख आणि एपीआय सचिन वाझे (Sachin Vaze) करत होते. मात्र वाझे यांची भूमिका संशयास्पद आढळून आल्याने हा तपास एनआयएकडे सोपविण्यात आला. यानंतर एनआयएने वाझेंनाचा अटक करताच त्यांनीच स्फोटकांची कार ठेवल्याचे तपासात समोर आले. वाझेंना २५ मार्चपर्यंतची कोठडी सुनावण्यात आली आहे. 

सचिन वाझे आणि मनसुख हिरेन यांचा परस्पर संबंध आल्याने एनआयएने हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपासही आपल्याकडेच देण्यात यावा अशी मागणी गृहमंत्रालयाकडे केली होती. महाराष्ट्र एटीएस याचा तपास करत होते. यासाठी आवश्यक परवानग्या गृह मंत्रालयाकडून एनआयएने मागितल्या होत्या. या परवानग्या एनआयएला गृहमंत्रालयाने आज दिल्या आहेत. यानुसार आजपासून एनआयएच मनसुख हिरेन प्रकरणात तपास करणार आहे.   एनआयएला खुनाची केस थेट हाती घेण्याचा अधिकार नाही. पण मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा संबंध अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या कारशी आहे. अंबानींच्या घराबाहेर आढळलेली कार हिरेन यांच्याच मालकीची होती. त्यामुळेच हिरेन यांच्या मृत्यूचा तपास करण्याची विनंती करण्यात आली होती.

Mansukh Hiren: मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडलेल्या परिसरात आणखी एक मृतदेह; मुंब्रा रेतीबंदर परिसरात खळबळ

मनसुख हिरेन यांचा मृत्यू नेमका कशामुळे?मनसुख हिरेन पाणी पडले त्यावेळी काही वेळ ते जिवंत होते. त्यांच्या फुफ्फुसात खाडीचं पाणी गेल्यानं त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती डायटम बोन अहवालातून समोर आली आहे. त्याआधी हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी एक अहवाल काही दिवसांपूर्वी समोर आला होता. त्यात मनसुख यांनी स्वत:ला वाचवण्याचा थोडा प्रयत्न केला होता. मात्र त्यांच्या फुफ्फुसात जास्त पाणी आढळून आलेलं नाही, अशी माहिती शवविच्छेदन अहवालातून पुढे आली होती. 

टॅग्स :Mansukh Hirenमनसुख हिरणsachin Vazeसचिन वाझेNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाUddhav Thackerayउद्धव ठाकरेHome Ministryगृह मंत्रालयMumbai policeमुंबई पोलीस