डोक्यात पेव्हरब्लॉक घालून एकाची भरदिवसा हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 17:44 IST2018-10-02T17:39:38+5:302018-10-02T17:44:11+5:30

उल्हासनगरमधील गोलमैदान बनलंय खुनी अड्डा

A man's day-to-day murder by putting a paverblock in the head | डोक्यात पेव्हरब्लॉक घालून एकाची भरदिवसा हत्या 

डोक्यात पेव्हरब्लॉक घालून एकाची भरदिवसा हत्या 

उल्हासनगर - शहरातील प्रसिद्ध गोलमैदानात सोमवारी दुपारी 2 वाजण्याच्यादरम्यान एकाच खून झाला. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

उल्हासनगर कॅम्प नं - 3 परिसरात प्रसिद्ध गोलमैदान असून मैदान खुनी अड्डा बनले आहे. दोन वर्षात मैदानात 3 खून झाल्याने, महिला व मुलात भीतीचे वातावरण निर्माण झाले. मैदानात असलेल्या प्रभाग समिती क्र- 2 च्या कार्यालयासमोरील खुल्या जागेत, दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास चौघडी नशा करीत होती. त्यांच्यात अज्ञात कारणावरून तू तू मै मैं होऊन हाणामारी झाली. तिघांनी रागाच्याभरात राजू लोंढे नावाच्या इसमाच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक घालून जखमी केले. हा प्रकार पालिका प्रभाग समितीसमोर झाला असून मारहाणीत राजू लोंढे जागीच ठार झाले. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. गोलमैदान परिसर चोराचा अड्डा झाला असून पोलिसांनी हत्येप्रकारणाचे पंचनामा केला. मंगळवारी सकाळी पोलिसांनी संशयित तिघांना ताब्यात घेतले. अधिक तपास पोलीस करीत आहेत

Web Title: A man's day-to-day murder by putting a paverblock in the head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.