Manoj Wani accuses Abhishek Patil of ransom | मनोज वाणी यांचा अभिषेक पाटलांवर खंडणीचा आरोप

मनोज वाणी यांचा अभिषेक पाटलांवर खंडणीचा आरोप

जळगाव : आपल्यावर आरोप असलेल्या महिलेलाच पुढे  करून आपल्याकडून कोट्यवधीची खंडणी उकळण्याचा डाव होता, तो फसला म्हणूनच अभिषेक पाटील यांनी कथित हनी ट्रॅपचा  बनाव केल्याचा आरोप या प्रकरणातील संशयित आरोपी मनोज वाणी याने गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.

त्याशिवाय अभिषेक पाटील व त्यांच्या मातोश्रींनी पाच वर्षांपूर्वी असाच हनी ट्रॅप यशस्वी केला होता, असा दावा केला. तसेच त्यांच्या मालकीच्या एका हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय चालत होता, असाही आरोप त्यांनी केला. वाणी यांनी आंटीची कथित ऑडिओ क्लिप सादर केली.

मनोज वाणी यांच्या आरोपात तथ्य नाही, असे राष्ट्रवादी  काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिषेक  पाटील यांनी सांगितले. पाटील  यांनी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन एका महिलेच्या माध्यमातून हनी ट्रॅपमध्ये अडकविण्याचा प्रयत्न होता व त्यासाठी मनोज वाणी यांनी  या महिलेला ५० हजार रुपये ॲडव्हान्स म्हणून दिले होते, असा आरोप केला होता.  या प्रकरणानंतर दोघांच्या जबाबावरून याप्रकरणी मनोज वाणी, आंटी व आणखी एक अशा तिघांविरुद्ध जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
 

English summary :
Manoj Wani accuses Abhishek Patil of ransom

Web Title: Manoj Wani accuses Abhishek Patil of ransom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.