फेसबुक पोस्टच्या वादातून काँग्रेस कार्यकर्ता मनोज दुबे हत्येप्रकरणी दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 17:54 IST2018-10-23T17:46:54+5:302018-10-23T17:54:12+5:30
साकीनाका पोलिसांनी तपासाअंती दोन मुख्य आरोपींना अटक केली आहे. फेसबुक पोस्टच्या वादातून घाटकोपरच्या असल्फा परिसरात काँग्रेस कार्यकर्ता मनोज दुबे यांची तलवार आणि चाकूने प्राणघातक वार करुन हत्या करण्यात आली होती. साकीनाका पोलीस पुढील तपास करत आहेत.

फेसबुक पोस्टच्या वादातून काँग्रेस कार्यकर्ता मनोज दुबे हत्येप्रकरणी दोघांना अटक
मुंबई - घाटकोपर येथे असल्फा परिसरात रविवारी मध्यरात्री काँग्रेस कार्यकर्ता मनोज दुबे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे जितेंद्र मिश्रा आणि उमेश ठाकूर अशी आहेत. साकीनाका पोलिसांनी तपासाअंती दोन मुख्य आरोपींना अटक केली आहे. फेसबुक पोस्टच्या वादातून घाटकोपरच्या असल्फा परिसरात काँग्रेस कार्यकर्ता मनोज दुबे यांची तलवार आणि चाकूने प्राणघातक वार करुन हत्या करण्यात आली होती. साकीनाका पोलीस पुढील तपास करत आहेत.
काँग्रेस कार्यकर्त्याची तलवारीने वार करून हत्या करणारे पोलिसांच्या ताब्यात