Manohar mama Bhosale: मनोहर मामा भोसलेला न्यायालयाचा दणका; पाच दिवसांची पोलीस कोठडी  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 02:44 PM2021-09-11T14:44:19+5:302021-09-11T14:44:52+5:30

Manohar Mama Bhosle Case: मनोहरमामा भोसले यांना केलेली अटक बेकायदा आहे. बनावट तक्रारदार उभा करुन सदरच्या गुन्ह्याबाबत तीन वर्षांनंतर बनावट गुन्हा दाखल केल्याचा दावा आरोपीचे वकील ठोंबरे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

Manohar Mama Bhosle Five days in police custody by Court | Manohar mama Bhosale: मनोहर मामा भोसलेला न्यायालयाचा दणका; पाच दिवसांची पोलीस कोठडी  

Manohar mama Bhosale: मनोहर मामा भोसलेला न्यायालयाचा दणका; पाच दिवसांची पोलीस कोठडी  

googlenewsNext

बारामती : कॅन्सर झालेल्या रुग्णास कॅन्सर बरा करतो, असे सांगून बारामती शहरातील एकाची २ लाख ५१ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी  मनोहर उर्फ मामा भोसले यास अतिरीक्त व जिल्हा सत्र न्यायाधीश डी.एन. गिऱ्हे यांनी १६ सप्टेंबर पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.(Manohar Mama Bhosle in 5 days Police custody.)

Manohar mama Bhosale: पोलिसांना पाहताच...; अशी झाली मनोहरमामा भोसलेला अटक

शशीकांत खरात (रा.साठेनगर, कसबा बारामती, ता बारामती. जि पुणे) यांनी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार तक्रारदार खरात यांच्या वडीलांना थायरॉईड कॅन्सर हा दुर्धर आजार झाला आहे. त्यामुळे खरात  हे मनोहरमामा भोसले भोंदुबाबाच्या मौजे सावंतवाडी, गोजूबावी (ता बारामती जि पुणे )मठामध्ये गेले. त्याने तो बाळूमामा यांचा अवतार असल्याचा बनाव केला. तक्रारदार यांच्या वडिलांचा गळ्यावरील थायरॉईड कॅन्सर बरा करतो, असे सांगून त्यावरील औषध म्हणून बाभळीचा पाला, साखर, भंडारा खाण्यास दिले. तसेच विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा व ओंकार शिंदे यांच्यासोबत संगनमत करून वेळोवेळी चढावा, अभिषेक व भेटीसाठी त्यांचेकडून एकुण २,५१,५००/- रुपये त्यांचे व त्यांचे वडीलांचे जिवाचे बरे वाईट होईल अशी भिती घालून देण्यास भाग पाडून त्यांची फसवणूक केली आहे. पैसे परत मागितल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद तालुका पोलीस ठाण्यात दाखल आहे.

या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिस स्थानिक गुन्हे शाखा व बारामती तालुका पोलिसांनी मनोहर मामाला शुक्रवारी(दि १०) सालपे (जि.सातारा) येथे फार्महाऊसवर जाऊन ताब्यात घेतले आहे. त्यानंतर बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात आणत त्याला शुक्रवारी सायंकाळी अटक करण्यात आली. आज मनोहरमामा यास न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीच्यावतीने आज अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरे यांनी बाजु मांडली. तर पोलीस प्रशासनाच्यावतीने सरकारी वकील किरण सोनवणे यांनी बाजु मांडली. दोन्ही बाजुचे युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश गिऱ्हे यांनी मनोहरमामा यास पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

 दरम्यान, मनोहरमामा भोसले यांना केलेली अटक बेकायदा आहे. बनावट तक्रारदार उभा करुन सदरच्या गुन्ह्याबाबत तीन वर्षांनंतर बनावट गुन्हा दाखल केल्याचा दावा आरोपीचे वकील ठोंबरे यांनी पत्रकारांशी बोलताना केला. न्यायालयाच्या आवारात पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता. मनोहरमामाच्या भक्तांसह समर्थकांची न्यायालय परीसरात गर्दी झाली होती.

Web Title: Manohar Mama Bhosle Five days in police custody by Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.