शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

मनीष आनंदसह ८ जणांवर विनयभंगासह खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 06:49 IST

Crime News : गाडीचा दरवाजा अचानक उघडल्याने दुचाकीवरून जाणारे ज्येष्ठ दाम्पत्य त्याला धडकून जखमी झाले. या प्रकरणी ज्येष्ठ दाम्पत्याला मारहाण केल्याबद्दल कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर गुन्हा दाखल होऊन अटक झाली होती.

पुणे -  गाडीचा दरवाजा अचानक उघडल्याने दुचाकीवरून जाणारे ज्येष्ठ दाम्पत्य त्याला धडकून जखमी झाले. या प्रकरणी ज्येष्ठ दाम्पत्याला मारहाण केल्याबद्दल कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर गुन्हा दाखल होऊन अटक झाली होती. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार जाधव व त्यांच्या महिला सहकाऱ्याचे अपहरण करून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते मनीष आनंद यांच्यासह ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.अमन चड्डा, करण चड्डा, ममता चड्डा, अजय चड्डा, मनीष आनंद (रा. खडकी बाजार) आणि दोन अनोळखी व लोकांच्या गर्दीतील एक जण अशा ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना औंध येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेसमोर तसेच औंधमधील एका चौकात १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ ते रात्री साडेआठ दरम्यान घडली. या प्रकरणात हर्षवर्धन जाधव यांनी ज्येष्ठ दाम्पत्याला बेदम मारहाण केली होती. त्यानंतर त्यांनी पुढील चौकात आणखी एका वाहनचालकाला धडक दिल्याने त्यांना जमावाने अडवून मारहाण केली होती. या प्रकरणी जाधव यांना अटक केली होती. मात्र, त्यांची तक्रार पोलिसांनी घेतली नाही. त्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली. याप्रकरणी हर्षवर्धन जाधव यांच्या महिला सहकाऱ्यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार फिर्यादी यांनी कार पार्क केली असताना कारचा दरवाजा उघडला असताना पाठीमागून अजय चड्डा व ममता चड्डा यांनी धडक देऊन मोठ्याने ओरडून फिर्यादी यांना शिवीगाळ केली. अजय यांनी फिर्यादी यांचा विनयभंग करून थोबाडीत मारली. त्यानंतर फिर्यादी व हर्षवर्धन जाधव औंध चौकात गेले असताना त्यांची गाडी अडवून गाडीची चावी जबरदस्तीने काढून घेतली. जाधव यांना खाली खेचून मारहाण करून त्यांच्या डोक्यात राॅडने व काठीने मारा असे म्हणून लोकांच्या गर्दीतून एका अनोळखी माणसाने फिर्यादी यांना कारमध्ये बसवून अपहरण करून अमन चड्डा, करण चड्डा व मनीष आनंद यांनी लैंगिक अत्याचार करून फिर्यादी यांना मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

टॅग्स :Courtन्यायालयPuneपुणे