शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

पॉर्न साइट्सवर विकायचा प्रेयसीचे अश्लील फोटो; एका मोठ्या कंपनीच्या मॅनेजरला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 11:50 IST

आरोपी आणि पीडित महिला दोघेही गेल्या काही वर्षांपूर्वी ट्रेनमध्ये भेटले होते. दोघांनी एकमेकांचा मोबाईल नंबर घेतला, मग येथून हे प्रेमाचे नाते सुरू झाले. दोघेही जवळपास 4 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते.

ठळक मुद्देप्रेयसीचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ पॉर्न साइट्सवर १०-२० रुपयांच्या विकले आहेत.आरोपी आणि पीडित महिला दोघेही गेल्या काही वर्षांपूर्वी ट्रेनमध्ये भेटले होते. दोघांनी एकमेकांचा मोबाईल नंबर घेतला, मग येथून हे प्रेमाचे नाते सुरू झाले. दोघेही जवळपास 4 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते.

नोएडा : एका नामांकित कंपनीत दरमहा एक लाख रुपये पगार असलेल्या मॅनेजरने ब्रेकअपनंतर आपल्या प्रेयसीचा बदला घेण्यासाठी तिचे अश्लील फोटो पॉर्न साइट्सवर विकल्याचे समोर आले आहे. या मॅनेजरने प्रेयसीचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ पॉर्न साइट्सवर 10-20 रुपयांच्या विकले आहेत. दरम्यान, याप्रकरणी प्रेयसीने पोलिसांत तक्रार दिली. यानंतर प्रेयसी महिलेचा मानसिक छळ पाहून पोलिसांचे एक पथक लॉकडाऊनदरम्यान पश्चिम बंगाल येथे रवाना झाले. त्यानंतर कोलकाता येथून पोलिसांनी आरोपीला अटक करुन नोएडा येथे आणले.

डीसीपी महिला सुरक्षा वृंदा शुक्ला यांनी सेक्टर -108 पोलीस आयुक्त कार्यालयात सांगितले की, महिलेने 3 मे रोजी फेज-3 पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी या महिलेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ दररोज सोशल साइट्सवर अपलोड केले जात होते. यासह काही प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ, फोटो विकून ई-वॉलेटमधून पैसेही घेतले जात होते. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असता त्यात दोन-तीन तरुणांची नावे समोर आली. यापैकी एका तरुणाचे या संबंधित महिलेशी 4-6 वर्षांपूर्वी संबंध होते.

पोलिसांना संपूर्ण प्रकरण समजले. आरोपी पश्चिम बंगालमधील बारुईपूर येथे होता. यानंतर फेज -3 पोलीस ठाण्याचे पथक पश्चिम बंगालमध्ये गेले. या पथकाने आरोपीला कोलकाताहून आणले आहे. आरोपी हा नॅशनल कंपनीत एरिया मॅनेजर आहे. याआधी आरोपी लखनऊ व इतर शहरांमध्ये राहत होता. या गुन्ह्यात आरोपीच्या काही साथीदारांचा देखील सहभाग असल्याचे संशय असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित महिला दोघेही गेल्या काही वर्षांपूर्वी ट्रेनमध्ये भेटले होते. दोघांनी एकमेकांचा मोबाईल नंबर घेतला, मग येथून हे प्रेमाचे नाते सुरू झाले. दोघेही जवळपास 4 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. या काळात आरोपीने बहाण्याने महिलेला काही अश्लील फोटो, व्हिडिओ मागितले, असा आरोप केला जात आहे. त्यावेळी काही व्हिडिओ आणि फोटो तयार केले. 

याशिवाय, असेही उघडकीस आले की आरोपी आणि त्याचे मित्र एका सोशल साइटवर ग्रुप चॅट करायचे, ज्यामध्ये आरोपीनेही अनेक वेळा या महिलेला या चॅटमध्ये सामील केले होते. यानंतर, दोघांमध्ये काही गोष्टीवरुन भांडण झाले आणि दोघांचा ब्रेकअप झाला. त्यानंतर महिलेने दुसऱ्या व्यक्तीशी लग्न केले. दरम्यान, आरोपीची पोस्टिंग कोलकाता येथे झाल्यामुळे त्याला पकडण्यास उशीर झाला. आरोपीने त्या महिलेसोबत सूड उगवण्याच्या उद्देशाने तिचे अश्लिल फोटो विकण्याचे काम सुरू केल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.

आणखी बातम्या...

CoronaVirus News : 'हा' देश झाला कोरोनामुक्त, पंतप्रधानांनी केला डान्स!

सिंथिया डी रिची आणि वादाचं जुनं नातं; बेनझीर भुट्टो यांच्यावरही आक्षेपार्ह भाष्य केलं होतं    

ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांनी कोरोना नियम मोडले, तर बॉसला होणार तुरुंगवास!

अमेरिकेत सर्वात मोठी आर्थिक मंदी येणार, अर्थशास्त्रज्ञांनी व्यक्त केली भीती 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsexual harassmentलैंगिक छळ